सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 08:53 IST2025-08-04T08:44:53+5:302025-08-04T08:53:02+5:30

Fixed Deposit Interest Rates for Senior Citizen: जर तुम्हालाही तुमचे कष्टाचे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवून उत्तम परतावा मिळवायचा असेल, तर फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा नेहमीच एक उत्तम पर्याय राहिला आहे. यामध्ये बाजारातील कोणताही धोका नाही आणि तुम्हाला वेळेवर हमी परतावा मिळतो.

Fixed Deposit Interest Rates for Senior Citizen: जर तुम्हालाही तुमचे कष्टाचे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवून उत्तम परतावा मिळवायचा असेल, तर फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा नेहमीच एक उत्तम पर्याय राहिला आहे. यामध्ये बाजारातील कोणताही धोका नाही आणि तुम्हाला वेळेवर हमी परतावा मिळतो. ग्राहकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना खूश करण्यासाठी, देशातील काही स्मॉल फायनान्स बँका FD वर इतके मोठं व्याज देत आहेत की तुम्हाला ते ऐकून आश्चर्य वाटेल. या बँका FD वर ८% ते ८.५०% पर्यंत उत्तम व्याज देत आहेत.

स्लाईस स्मॉल फायनान्स बँक सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक दोघांनाही ८.५०% समान व्याजदर देत आहे. ग्राहकांना हे व्याज १८ महिने १ दिवस ते १८ महिने २ दिवस या कालावधीसाठी मिळेल.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना दीर्घकालीन गुंतवणुकीवर प्रचंड फायदे देत आहे. जर तुम्हाला ५ वर्षांसाठी पैसे गुंतवायचे असतील आणि ते विसरून जायचे असेल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. यामध्ये बँक ज्येष्ठ नागरिकांना ८.४०% दरानं व्याज मिळतं आणि सामान्य नागरिकांना ७.७५% दरानं व्याज मिळतं.

युनिटी बँक १००१ दिवसांची विशेष एफडी योजना चालवत आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना ८.२५% चा आकर्षक व्याजदर मिळत आहे. तर सामान्य नागरिकांना ७.७५% दरानं व्याज मिळतं.

जन स्मॉल फायनान्स बँक १ ते ३ वर्षांच्या मध्यम मुदतीच्या एफडीवर खूप चांगलं व्याज देत आहे. ज्यांना जास्त काळ पैसे रोखायचे नाहीत ते येथे गुंतवणूक करू शकतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना ८.२५% दराने व्याज मिळतं आणि सामान्य नागरिकांना ७.७५% दराने व्याज मिळतं.

या यादीत उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पाचव्या क्रमांकावर आहे, जी २ ते ३ वर्षांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ८% पेक्षा जास्त व्याज देत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना ८.१५% व्याज मिळतं आणि सामान्य नागरिकांना ७.६५% व्याज मिळतं.

अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की या स्मॉल फायनन्स बँकांमध्ये पैसे ठेवणे सुरक्षित आहे का? तर उत्तर आहे- हो, ते पूर्णपणे सुरक्षित आहे. स्टेट बँक (SBI), HDFC किंवा ICICI सारख्या मोठ्या बँका ज्याप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार काम करतात, त्याचप्रमाणे या स्मॉल फायनान्स बँका देखील RBI च्या देखरेखीखाली काम करतात. याशिवाय, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या (DICGC) नियमांनुसार, प्रत्येक ग्राहकाची ५ लाख रुपयांपर्यंतची ठेव पूर्णपणे सुरक्षित आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)