१००० रुपयांत १० वर्षांत कोट्यधीश! लॉटरीचं तिकिट नाही, फक्त मेहनतीचे पैसे येथे गुंतवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:39 IST2024-12-19T16:30:08+5:302024-12-19T16:39:41+5:30
invest in mutual fund : योग्य आर्थिक नियोजन केले तर तुम्ही देखील काही वर्षात कोट्यधीश होऊ शकता. होय, तुम्ही बरोबर वाचलत. अगदी दररोज हजार रुपयांनी गुंतवणूक केली तरी हे शक्य आहे. फक्त १० वर्षात तुम्ही हे लक्ष्य गाठू शकता. यासाठी तुम्हाला पैशांची बचत करुन योग्य ठिकाणी गुंतवावे लागेल.

१० वर्षात कोट्यधीश होण्यासाठी तुम्हाला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) ची मदत घ्यावी लागेल. तुम्ही म्युच्युअल फंडाबद्दल ऐकलेच असेल. शेअर मार्केटच्या तुलनेत येथे पैसे बुडण्याची जोखीम कमी असते. शिवाय गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या निधीचीही आवश्यकता नाही.
तुम्ही चांगल्या म्युच्युअल फंडात दरमहा ३०,००० रुपयांची SIP केली तर हे लक्ष्य दूर नाही. काही लोकांसाठी ही रक्कम जास्ट वाटू शकते. पण, रोज १००० रुपयांची बचत करण्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास याचा भार हलका होईल.
सध्याच्या एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही म्युच्युअल फंडात दरमहा ३०,००० रुपयांची एसआयपी केली तर तुम्ही १० वर्षांत कोट्यधीश होऊ शकता.
दरमहा ३०,००० रुपये गुंतवले तर १० वर्षांत तुमची गुंतवणूक ३६ लाख रुपये होईल. या रकमेवर तुम्हाला वार्षिक सरासरी १८ टक्के परतावा मिळाल्यास, १० वर्षांच्या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक १ कोटी रुपये होईल.
बाजारात असे अनेक म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत, ज्यांनी सरासरी वार्षिक १२-१८% परतावा दिला आहे. परताव्यात चढ-उतार होऊ शकतो. म्हणून परिपक्वतेवर प्राप्त होणारी रक्कम वाढू शकते किंवा कमी होऊ शकते.
जर तुम्ही योग्य आर्थिक नियोजन करुन या योजनेवर ठाम राहिलात तर तुम्ही १० वर्षात एक कोटी रुपयांपर्यंतचा निधी जमा करू शकता.
(डिस्क्लेमर : येथे दिलेली माहिती हे एक साधे गणित आहे. हा कुठल्याही प्रकारे गुंतवणूक सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांची सल्ला घ्या.)