गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:04 IST2025-07-30T12:52:52+5:302025-07-30T13:04:47+5:30
Home Loan : अनेकांना स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न असतं. पण, गृहकर्ज घेताना तुमचा पगार किती असावा, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

जर तुम्ही होमलोन ९% व्याजदराने आणि २० वर्षांच्या कालावधीसाठी घेत असाल, तर तुमच्या कर्जाचा मासिक हप्ता (EMI) किती येईल आणि त्यासाठी तुमचा पगार किती असावा, याचा एक अंदाज इथे दिला आहे.
जर तुम्हाला १० लाख रुपयांचं गृहकर्ज हवं असेल, तर तुमचा मासिक हप्ता (EMI) सुमारे ८,९९७ रुपये येईल. यासाठी तुमचा किमान मासिक पगार २२,५०० रुपये असणं गरजेचं आहे.
२० लाख रुपयांच्या गृहकर्जासाठी तुमचा EMI सुमारे १७,९९४ रुपये असेल. यासाठी तुमचा किमान पगार ४५,५०० रुपये असावा लागतो.
३० लाखांसाठी तुमचा पगार ६७,५०० रुपये, तर ४० लाखांसाठी ९०,००० रुपये आवश्यक आहे. जर तुम्ही ५० लाखांचं कर्ज घेत असाल, तर तुमचा किमान पगार १,१२,५०० रुपये असावा.
६० लाखांसाठी १,३५,००० रुपये, ७० लाखांसाठी १,५७,५०० रुपये आणि ८० लाखांसाठी १,८०,००० रुपये किमान मासिक पगार असणं आवश्यक आहे.
९० लाख रुपयांच्या होमलोनसाठी तुमचा EMI सुमारे ८०,९७३ रुपये येईल, आणि यासाठी किमान पगार २,०२,५०० रुपये असावा लागतो.
जर तुम्ही थेट १ कोटी रुपयांचं होमलोन घेत असाल, तर तुमचा मासिक हप्ता ८९,९७० रुपये असेल. यासाठी तुम्हाला किमान २,२५,००० रुपये मासिक पगार असणं गरजेचं आहे.
बँका साधारणपणे तुमच्या मासिक पगाराच्या ४०% पेक्षा जास्त EMI नसावा, असा सल्ला देतात. यामुळे तुम्हाला कर्ज फेडणं सोपं जातं.
हे आकडे तुम्हाला तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती पगाराची गरज आहे, याचा एक स्पष्ट अंदाज देतात. त्यानुसार योग्य आर्थिक नियोजन करून तयारी करणे महत्त्वाचे आहे.