सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी नेमकी किती पैसे खर्च करायचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 00:37 IST2025-03-16T00:30:40+5:302025-03-16T00:37:08+5:30

How to Keep Cibil Score Good: सिबिल स्कोअर हा आर्थिक व्यवहारासाठीच नाही, तर लग्न ठरवण्यासाठी महत्त्वाचा बनला आहे. त्यामुळे त्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.

कर्ज मिळविण्यासाठी व भविष्यात नवीन क्रेडिट कार्ड मिळविण्यास आपण चांगला सिबिल स्कोअर ठेवण्याचा प्रयत्न करतो. यासाठी कर्ज आणि क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर केले जातील याची काळजी घेतो. असे असूनही अनेक वेळा सिबिल स्कोअर कमी होतो.

क्रेडिट कार्डच्या मर्यादपैकी फक्त ३० टक्के रक्कम वापरली पाहिजे. म्हणजे १ लाख लिमिट असेल तर ३० हजारच खर्च करा. क्रेडिट लिमिट वापर ७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो.

तुमचे उत्पन्न स्थिर असल्यास आणि पेमेंट इतिहास चांगला असल्यास, बँकेला मर्यादा वाढवण्याची विनंती करा.

तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास, नियमित बिलांना २-३ कार्डामध्ये विभाजित करा. यामुळे एका कार्डच्या वापराचे प्रमाण वाढणार नाही.

कार्डला मोबाइल अॅप किंवा एसएमएस अलर्ट सेट करा. यामुळे तुमचा खर्च ३० टक्क्यांच्या वर गेल्यास तुम्हाला अलर्ट मिळेल.

वारंवार मर्यादा ओलांडल्याने बँका तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत समजतात. कर्ज किंवा नवीन कार्डसाठी अर्ज नाकारला जाऊ शकतो.

सिबिल स्कोअर घसरल्यामुळे भविष्यात कर्ज मिळणे कठीण होते. जरी तुम्ही सध्या सर्व पेमेंट वेळेवर करत असाल. पण जुना रेकॉर्ड चांगला नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर ७ वर्षांपर्यंत दिसू शकतो.