Kuldeep Yadav Marriage: कुलदीप यादवचा विवाह होणाऱ्या हॉटेलचं एका रात्रीचं भाडं किती माहितीये, कोण आहे मालक? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:53 IST2026-03-14T13:38:45+5:302026-03-14T13:53:38+5:30
Khuldeep Yadav Marriage: भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादवच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. १४ मार्च रोजी तो वंशिका हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

Khuldeep Yadav Marriage: भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादवच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. १४ मार्च रोजी तो वंशिका हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. उत्तराखंडमधील मसूरी येथील 'द सेवॉय' (The Savoy) या प्रसिद्ध हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.

या सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबांव्यतिरिक्त विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या क्रिकेट जगतातील दिग्गज व्यक्तींसोबत अनेक अतिविशिष्ट व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ३१ वर्षीय कुलदीपच्या लग्नासाठी संपूर्ण हॉटेल बुक करण्यात आलं असून, दोन-तीन दिवस हे हॉटेल इतर कोणाही पर्यटकासाठी उपलब्ध नसेल.

'द सेवॉय' हे मसूरीमधील एक ऐतिहासिक हॉटेल आहे. सध्या हे हॉटेल आयटीसी हॉटेल्सच्या (ITC Hotels) लक्झरी हेरिटेज चेनचा भाग आहे. याला 'सेवॉय- ए स्टारवुड हॉटेल' म्हणूनही ओळखले जाते.

१८३८ मध्ये बांधलेले हे हॉटेल भारतातील सर्वात जुन्या हॉटेल्सपैकी एक आहे. १८९० मध्ये आयरिश बॅरिस्टर सेसिल डी'लिंकन यांनी ही मालमत्ता खरेदी केली होती आणि त्याचे हॉटेलमध्ये रूपांतर केले होते.

सध्या याचे व्यवस्थापन आयटीसी ग्रुपद्वारे केले जाते. ब्रिटीश काळात हे हॉटेल 'समर कॅपिटल' म्हणून प्रसिद्ध होते. या हॉटेलमध्ये मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू यांसारख्या बड्या व्यक्तींनी वास्तव्य केलं आहे.

'द सेवॉय'मध्ये एका रात्रीच्या वास्तव्याचे भाडे साधारणपणे २०,००० ते २३,४०० रुपयांपासून सुरू होतं. हे दर सुपीरियर, प्रीमियम आणि सुईट्स अशा विविध श्रेणींवर आधारित असतात. तसेच, हंगामातील मागणी आणि उपलब्धतेनुसार भाड्यामध्ये बदल होऊ शकतो. मसूरीमधील सर्वात आलिशान हेरिटेज हॉटेल्समध्ये याची गणना केली जाते.

















