दुबईतील बुर्ज खलिफा येथे एका फ्लॅटची किंमत किती आहे? मुंबईच्या तुलनेत स्वस्त की महाग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 11:25 IST2025-01-08T11:23:10+5:302025-01-08T11:25:19+5:30

dubai burj khalifa flat Price : देशातील महागड्या घरांच्या विषय निघाला की आपल्या डोळ्यांसमोर मायानगरी मुंबई उभी राहते. इथं काही स्केवर फुटांच्या घरांसाठी कोट्यवधी रुपयांची डील होते. पण, दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये फ्लॅटची किंमत किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

कधीतरी आपणही दुबईला फिरायला जावं, असा विचार तुमच्याही मनात नक्कीच आला असेल. जगभरातील पर्यटकांच्या आवडत्या शहरामध्ये याचा समावेश होतो. इथंल्या गगनचुंबी इमारती आणि वास्तूशैली बघणाऱ्या स्मितीत करुन टाकतात. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा ही तर आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार मानला जातो.

८२८ मीटर उंच असलेली ही इमारत आयफेल टॉवरपेक्षा तिप्पट उंच आहे. यात १६३ मजले, ५८ लिफ्ट, २,९५७ पार्किंग स्पेस, ३०४ हॉटेल रूम, ३७ ऑफिस फ्लोर आणि ९०० लक्झरी अपार्टमेंट आहेत.

यात ९ ते १६ मजल्यावरील अरमानी निवासस्थानांमध्ये आलिशान एक आणि दोन बेडरूमचे अपार्टमेंट आहेत. ४५ ते १०८ मजल्यांवर एक ते चार बेडरुम असणारे आलिशान खाजगी अपार्टमेंट आहेत.

दुबईच्या एका गृहनिर्माण वेबसाइटनुसार, बुर्ज खलिफामधील अपार्टमेंटच्या किंमती १ BHK : ३.७३ कोटी रुपये, २ BHK ५.८३ कोटी रुपये. ३ BHK : १४ कोटी रुपये.

याव्यतिरिक्त, बुर्ज खलिफातील २१,००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले सर्वात मोठे पेंटहाऊसची किंमत अंदाजे २४० कोटी रुपये आहे. ही सर्व घरे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सुविधांनी सुसज्ज आहेत.

मुंबईतही घरांच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. गेल्या महिन्यात शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार जगदीश मास्टर यांच्या पत्नी उर्जिता जगदीश मास्टर यांनी एक अपार्टमेंट१०५ कोटी रुपयांना खरेदी केला होता. नवीन खरेदी केलेले अपार्टमेंट ७१३० स्क्वेअर फूटचे आहे. हे अपार्टमेंट ॲनी बेझंट रोडवर आहे.