३१ मार्च पूर्वी करा हे काम नाहीतर तुमचं पॅनकार्ड होईल रद्द; भरावा लागेल दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 11:46 AM2021-03-22T11:46:40+5:302021-03-22T11:52:13+5:30

पॅनकार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ३१ मार्च २०२१ पूर्वी तुमचं पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करुन घ्या. नाहीतर पॅनकार्ड रद्द होईल. लिंक कसं करावं याची माहिती जाणून घेऊयात...

जर तुमचा पर्मनंट अकाऊंट क्रमांक (पॅन) तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल तर पुढच्या महिन्यापासून तुमचे पॅन कार्ड निरुपयोगी होईल.

पॅनकार्डला आधारशी लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने अनेकदा मुदतवाढ दिली होती. पण आता ३१ मार्चनंतर मुदतवाढ केली जाणार नाहीय. आधारशी जोडलेले नसलेले सर्व पॅनकार्ड अंतिम मुदत संपल्यानंतर निरुपयोगी आणि निष्क्रिय ठरतील.

बँक खाते उघडणे, आयकर भरणे, म्युच्युअल फंड किंवा शेअर्स खरेदी करणे आणि इतर अनेक महत्वाच्या व्यवहारांसाठी पॅनकार्ड अतिशय महत्वाचे असते. त्यामुळे तेच जर निष्क्रिय झालं तर १ एप्रिलनंतर तुम्हाला मोठ्या अडचणींनासामोरं जावं लागू शकतं. इतकंच काय तर १० हजारांचा दंड देखील भरावा लागू शकतो.

आपला पॅन आधारशी जोडण्यासाठी आयकर विभागाच्या (Income Tax) ई-फाईलिंग पोर्टलला भेट द्या. डाव्या बाजूला असलेल्या लिंक आधार सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर आपला पॅन नंबर, आधार क्रमांक आणि नाव भरा. कॅप्चा कोड भरा. ‘Link Aadhaar’ ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमचा पॅन आधार लिंकिंग पूर्ण होईल.

एसएमएसद्वारे आपल्या पॅनला आधार क्रमांकाशी लिंक करू शकता. यासाठी आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवा.

आपल्या मोबाईलमध्ये UIDPAN म्हणजेच तुमचा १२ अंकी आधार क्रमांक आणि १० अंकी पॅनकार्ड क्रमांक टाईप करा आणि हा मेसेज 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा. तुमचं पॅनकार्ड आधारशी लिंक होऊन जाईल.

पॅनकार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत संपल्यानंतर तुम्ही जर लिंक करायला गेलात तर दंड भरावा लागणार आहे. दंडाची तरदूत तब्बल १० हजार रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. पॅनकार्ड आधारशी लिंक केलं नसेल तर तातडीनं करुन घ्या.