Home Loan Interest Rates : कोणती बँक किती व्याजदराने देतेय गृहकर्ज? जाणून घ्या, सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 16:41 IST2021-10-20T16:17:44+5:302021-10-20T16:41:41+5:30
Home Loan Interest Rates : घरांची वाढती मागणी आणि सणासुदीच्या काळात बँकांनी गृहकर्जाचे दर कमी केले आहेत.

नवी दिल्ली : जर तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. सनासुदीच्या काळात अनेक बँकांव्यतिरिक्त गृहनिर्माण वित्त कंपन्यांनी गृहकर्जाचे दर कमी केले आहेत.
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), येस बँक(Yes Bank), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा (BOB), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एलआयसी हाऊसिंग फायनान्स (LIC Housing Finance) सर्वात स्वस्त गृहकर्ज ऑफर करत आहेत.
दरम्यान, घरांची वाढती मागणी आणि सणासुदीच्या काळात बँकांनी गृहकर्जाचे दर कमी केले आहेत. त्यामुळे जाणून घेऊया, कोणत्या बँक कोणत्या व्याजदराने गृह कर्ज देत आहे…
HDFC Bank:
एचडीएफसी बँकेने (HDFC Bank)सणांचा हंगाम पाहता गृहकर्जाच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. ज्याअंतर्गत ग्राहक 6.70 टक्के वार्षिक व्याज दराने गृहकर्ज घेऊ शकतील. हे व्याजदर 20 सप्टेंबर 2021 पासून लागू झाले. ही विशेष योजना 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत उपलब्ध असेल.
LIC Housing Finance:
एलआयसी हाऊसिंग फायनान्सने (LIC Housing Finance) 50 लाख रुपयांपासून 2 कोटी रुपयांपर्यंत गृह कर्जाचा व्याजदरात घट करून 6.66 टक्के केला आहे. हे कर्ज फक्त 22 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत घेतलेल्या गृहकर्जावर लागू होईल.
Yes Bank:
येस बँक (Yes Bank) सणासुदीच्या काळात केवळ 6.7% दराने गृहकर्ज देत आहे.
Kotak Mahindra Bank:
कोटक महिंद्रा बँकेने (Kotak Mahindra Bank) गृह कर्जाचे व्याजदर 15bps म्हणजेच 0.15 टक्के कमी करून 6.65 टक्क्यांवरून 6.50 टक्के केले आहे. हे नवीन दर 10 सप्टेंबर 2021 पासून लागू होतील आणि 8 नोव्हेंबर 2021 रोजी समाप्त होतील.
SBI:
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) फक्त 6.70 टक्के दराने क्रेडिट स्कोअर लिंक्ड गृहकर्ज देण्याची ऑफर दिली आहे. कर्जाची रक्कम कितीही असली तरी. यापूर्वी 75 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जाची परतफेड 7.15 टक्के दराने करावी लागत होती. सणासुदीच्या ऑफर सुरू केल्यामुळे, आता कर्जदारांना किमान 6.70 टक्के दराने गृहकर्ज घेता येईल.
Bank of Baroda:
बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda)आपल्या गृह कर्जावरील व्याज दर 6.75 टक्क्यांवरून 6.50 टक्के केले आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत ग्राहक या नवीन दरांचा लाभ घेऊ शकतात, असे बँकेने म्हटले आहे. हे नवीन दर गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्या सर्व ग्राहकांना उपलब्ध असतील.
Canara Bank:
यापूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने (Canara Bank) एमसीएलआरमध्ये (MCLR) 0.15 टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली होती. बँकेने एक वर्षाचा MCLR दर 0.10 टक्क्यांनी कमी करून 7.25 टक्के केला आहे. कॅनरा बँकेचे नवीन दर 7 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. बँकेने एक दिवसासाठी आणि एक महिन्यासाठी MCLR 0.15 टक्क्यांवरून 6.55 टक्के केले आहे.
Punjab National Bank:
पीएनबीने (PNB)50 लाखांवरील गृहकर्जावरील व्याज दर 0.50 टक्क्यांनी कमी करून 6.60 टक्के केले आहेत.