जिओ वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! या २ प्लॅनमध्ये २० जीबी डेटा मोफत मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 18:00 IST2025-03-13T17:34:39+5:302025-03-13T18:00:26+5:30

जिओ त्यांच्या काही प्रीपेड प्लॅनसह २० जीबी डेटा मोफत देते. या प्लॅनमध्ये ९० दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि २ जीबी डेटा मिळतो.

जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. जिओने त्यांच्या काही प्रीपेड प्लॅनसह २० जीबी डेटा मोफत देते.

यामध्ये तुम्हाला २० जीबी डेटा पूर्णपणे मोफत मिळतो, तोही कोणत्याही अटीशिवाय.

या मोफत डेटासह जिओच्या सर्वात स्वस्त प्लॅनची ​​किंमत ७४९ रुपये आहे. या प्लॅनची ​​वैधता ७२ दिवसांची आहे. या यादीतील दुसऱ्या प्लॅनची ​​किंमत ८९९ रुपये आहे आणि हा प्लॅन ९० दिवसांसाठी आहे.

रिलायन्स जिओ ७४९ रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज २ जीबी हाय स्पीड डेटा देते. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात.

या प्लॅनची ​​वैधता ७२ दिवस आहे. तर ७२ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या योजनेत एकूण १४४ जीबी हाय स्पीड डेटा उपलब्ध आहे. याशिवाय, तुम्हाला या प्लॅनमध्ये २० जीबी मोफत डेटा देखील मिळतो, त्यानुसार, तुम्हाला या प्लॅनमध्ये १६४ जीबी डेटाचा फायदा मिळतो.

८९९ रुपयांच्या या जिओ प्रीपेड प्लॅनमध्ये, रिलायन्स जिओकडून दररोज २ जीबी हाय स्पीड डेटा दिला जातो. या प्लॅनची ​​वैधता ९० दिवसांची आहे, त्यानुसार, या प्लॅनमध्ये एकूण १८० जीबी हाय स्पीड डेटा मिळतो.

पण, जिओ या प्लॅनमध्ये २० जीबी अतिरिक्त डेटा देखील देत आहे, म्हणजे ८९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण २०० जीबी डेटाचा फायदा मिळेल, तोही ९० दिवसांसाठी आहे.