सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:26 IST2025-10-30T17:22:02+5:302025-10-30T17:26:39+5:30

Gold Price News: या वर्षाच्या सुरुवातीपासून जगरभरात सोन्याच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढत होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून या किमती सातत्याने घटू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच या किमती आणखी घटून सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी १ लाख रुपयांच्या खाली येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. सोने, आणि चांदीचे दर येत्या काळात का घटू शकतात. याची तीन प्रमुख कारणं आज आपण जाणून घेऊयात.

सोन्यामधील गुंतवणूक ही आपल्याकडे सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळेच अस्थिरता निर्माण झाल्यावर जगभरात सोन्यामधील गुंतवणुकीचा ओघ वाढतो. मात्र जेव्हा जगात शांतता असते तेव्हा सोन्याच्या किमती घसरतात. या वर्षाच्या सुरुवातीपासून जगरभरात सोन्याच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढत होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून या किमती सातत्याने घटू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच या किमती आणखी घटून सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी १ लाख रुपयांच्या खाली येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. सोने, आणि चांदीचे दर येत्या काळात का घटू शकतात. याची तीन प्रमुख कारणं आज आपण जाणून घेऊयात.

अमेरिका आणि चीन या दोन शक्तिशाली देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून व्यापार युद्ध सुरू आहे. तसेच टॅरिफ आणि पुरवठा साखळीमध्येही तणाव असल्याने जागतिक बाजाराता अस्थिरता निर्माण झाली होती. मात्र आता दोन्ही देश व्यापार करार करण्याच्या अगदी जवळ पोहोचले असून, त्यामुळे जगाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्यातच अमेरिकेचा सामना करण्यासाठी चीन स्वत:कडील सोन्याचा साठा वेगाने वाढवत होता. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. तसेच व्यापार कराराबाबतही सकारात्मक चर्चा असल्याने गुंतवणुकदारांचा विश्वास पुन्हा एकदा शेअर बाजार आणि उद्योगांकडे वळण्याची शक्यता आहे. ही बाब सोन्याच्या भाववाढीला ब्रेक लावणारी ठरणार आहे.

भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक असलेला देश आहे. अशा परिस्थितीत जर भारत आणि अमेरिकेमधील व्पापारी संबंध भक्कम झाले तर त्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर होईल. एका नव्या ट्रेड पॅक्टमुळे भारताला परकीय गुंतवणूक मिळेल. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होईल. तसेच सुपया मजबूत झाल्यास आपल्याला सोनंही अधिक स्वस्तात मिळेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती स्थिर राहिल्या तरी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती कमी होतील. अशा परिस्थितीत सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच इच्छुक असलेल्या गुंतवणुकदारांना येत्या काही महिन्यांमध्ये मोठा दिलासा मिळू शकतोय त्यामुळे सोन्याच्या किमती १ लाखाच्या आय येऊ शकतात.

आखातील देशातील घडामोडी ह्या जागतिक अर्थव्यवस्थेला नेहमीच प्रभाव राहिलेला आहे. या भागात इस्राइल आणि हमासमध्ये गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष सुरू होता. या युद्धामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता आणि भीतीचं वातावरण होतं. दरम्यान, आता दोन्ही देशांमध्ये युद्धविरामासह वाटाघाटींची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच यासाठी स्वत: डोनाल्ड ट्रम्प पुढाकार घेत आहेत. आता हा युद्धविराम खरोखरच टिकला तर सोन्याच्या किमती घटू शकतात. तसेच गुंतवणूकदार आपल्याकडील पैसा हा शेअर बाजार, बाँड आणि रियल इस्टेटमध्ये गुंतवू शकतात.

दक्षिण आशियातील अस्थिरतेच्या राजकारणाबाबत आंतरराष्ट्रीय गुंतवकणूकदार सावध असतात. दरम्यान, काही दिवस चाललेल्या या संघर्षानंतर दोन्ही देश संघर्षविरामासाठी राजी झाले होते. खरंतर या दोन देशांचा आंतरराष्ट्रीय व्यापारात तेवढाचा मोठा वाटा नाही. मात्र शांततेचं वातावरण व्यापार आणि गुंतवणुकीसाठी उपयुक्त असतं.

दरम्यान, या चारही कारणांमध्ये अमेरिकेचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभाग आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या चारही बाबींमध्ये आपल्या पद्धतीने डील करण्यात यशस्वी ठरले तर सोन्याच्या किमती आणखी कमी होतील.