By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 09:39 IST
1 / 7Gold-Silver Prices 3 April: जर तुम्ही लग्नसराईसाठी सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जागतिक आणि देशांतर्गत दोन्ही बाजारपेठांमध्ये सोन्या-चांदीच्या किमतीत घट पाहायला मिळत आहे. 2 / 7आज जागतिक वायदा बाजार 'कॉमेक्स'वर सोन्याचा भाव २.२९% च्या घसरणीसह ४,७०२.७० डॉलर प्रति औंसवर आला आहे. त्याचप्रमाणे, चांदीची किंमत ३.८२% नं घसरून ७३.१७० डॉलर प्रति औंस झाली आहे.3 / 7आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केटमधील या घसरणीमागे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ हे मुख्य कारण आहे. आज कच्च्या तेलाच्या किमतीत ११.९४७% ची वाढ होऊन ती ११२.०६७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर कच्च्या तेलाच्या दरात ही तेजी आली.4 / 7राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराण युद्ध २ ते ३ आठवड्यांत थांबवण्याबाबत भाष्य केलं असलं तरी, त्यांनी निश्चित कालमर्यादेचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. ट्रम्प यांच्या या विधानानंतर बाजारात अनिश्चितता वाढत आहे. सध्या 'सेफ हेवन' मानल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीपेक्षा डॉलर इंडेक्स आणि कच्च्या तेलात चांगला परतावा मिळत असल्यानं गुंतवणूकदार त्यांना पसंती देत आहेत. 5 / 7दरम्यान, गुरुवारी एमसीएक्सवर (MCX) सोन्याचा भाव १,४९,६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. तर चांदी ४.४८ टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह २,३२,६०० रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाली.6 / 7बाजाराची सध्याची स्थिती पाहता गुंतवणूकदार सध्या सोन्या-चांदीसारख्या कमोडिटीपासून दूर राहत आहेत. मात्र, किमतीत होणारी ही घट सामान्य जनतेसाठी फायदेशीर ठरत आहे. 7 / 7लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्यामुळे भारतात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढते. अनेकदा किमती कितीही असल्या तरी दागिने खरेदी करण्याला प्राधान्य असतं, त्यामुळे कमोडिटी मार्केटमधील ही घसरण अशा खरेदीदारांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.