शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Rates Today: फेडच्या निर्णयापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; विक्रमी तेजीपेक्षा गोल्ड २४,३९५ आणि सिल्व्हर १,६८,६०३ नं स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 10:30 IST

1 / 7
Gold Silver prices on MCX, 18 March: आज १८ मार्च २०२६, बुधवार रोजी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. घरगुती वायदा बाजार MCX वर सोन्याचा भाव १,५५,६०५ रुपये प्रति दहा ग्रॅमवर स्थिरावला आहे.
2 / 7
तर चांदीचा दरही मोठ्या घसरणीनंतर २,५१,३९७ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असणाऱ्या COMEX वर देखील ही घसरण सुरूच असून सोन्याचा दर ५००० डॉलरच्या खाली घसरून ४,९९८.७० डॉलरवर आला.
3 / 7
याचप्रमाणे चांदीच्या किमतीत १.३० टक्क्यांची घट होऊन ती ७८.८८० डॉलरवर आली. ही दरवाढ सर्वसामान्य जनतेसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे.
4 / 7
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक लवकरच व्याजदरांबाबत आपला महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असून त्यापूर्वीच कमोडिटी मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जर फेडने व्याजदरात कपात केली, तर ते सोने आणि चांदीसाठी सकारात्मक संकेत ठरू शकतात.
5 / 7
मात्र, सध्या कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि महागाईची स्थिती पाहता, अमेरिकन मध्यवर्ती बँक हा निर्णय तूर्तास पुढे ढकलण्याची शक्यता नाकारता येत नाही. फेडच्या या निर्णयाकडे जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष लागलं आहे, कारण यामुळे बाजाराला भविष्यातील नवी दिशा मिळणार आहे. दरम्यान, अनेक बाजार तज्ज्ञांच्या मते अल्पकालीन घसरण असली तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं-चांदी अजूनही फायदेशीर ठरू शकतात.
6 / 7
सोने आणि चांदीने २९ जानेवारी २०२६ रोजी आतापर्यंतचा आपला सर्वोच्च ऐतिहासिक स्तर गाठला होता. त्यावेळी सोन्याची किंमत १,८०,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली होती, त्या तुलनेत सध्याचा भाव २४,३९५ रुपयांनी स्वस्त झाला आहे.
7 / 7
तसंच चांदीनं ४,२०,००० रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला होता, ज्यामध्ये आता १,६८,६०३ रुपयांची मोठी घट झाली आहे. मध्य-पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती असूनही मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर्समुळे सध्या मोठी तेजी दिसत नसली, तरी भविष्यात यात मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येतेय.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीInvestmentगुंतवणूक