Gold Silver : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दर घसरले; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 15:18 IST2025-01-08T15:14:09+5:302025-01-08T15:18:47+5:30
Gold Silver : सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Gold Silver Rate : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Gold Silver Rate : मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. रशिया युक्रेन युद्धामुळे आधी दरात वाढ झाली होती, तर दुसरीकडे इस्त्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या तणावामुळे वाढ झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाली असून देशांतर्गत बाजारातही घसरण झाली आहे. काल कॉमेक्सवर सोने १५ डॉलरने वाढून २६६५ डॉलरच्या आसपास पोहोचले आहे.
चांदीचे दर चौथ्या दिवशीही ३० डॉलरवर आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव ३५० रुपयांनी वाढून ७७,५०० रुपयांच्या वर बंद झाला.
चांदीचा भाव सुमारे ३०० रुपयांनी वाढून ९०,८०० रुपयांच्या वर बंद झाला.
आज सकाळी एमसीएक्सवर सोने १०० रुपयांनी घसरून ७७,४३१ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होते.
काल ७७,५३१ रुपयांवर बंद झाला. तर चांदीचा भाव १४३ रुपयांनी घसरून ९०,७३० रुपयांवरून ९०,८७३ रुपयांवर आला.
चंदीगड, दिल्ली, लखनौ, जयपूरमध्ये १० ग्रॅम २४ कॅरेटचे सोने ७८९७० रुपये एवढा दर आहे.
मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद, आणि नागपूरमध्ये सोन्याचा दर ७८८२० रुपये इतका आहे. अहमदाबाद, पाटणा या शहरांमध्ये १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७८८७० रुपये आहे.