By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 13:22 IST
1 / 6गेल्या १० दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली. १६ मार्च २०२६ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५६,४३६ रुपये होता, जो २७ मार्च रोजी १,४२,९४२ रुपयांवर आला. अर्थात सोन्याच्या दरात १३४९४ रुपयांची मोठी घसरण झाली आहे.2 / 6सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी घट दिसून आली. १६ मार्च रोजी एक किलो चांदीचा दर २५२७९३ रुपये होता. तो २७ मार्च रोजी २,२१,६४७ रुपयांवर आला. म्हणजेच, चांदीच्या किमतीतही एकूण ३१,१४६ रुपयांची घसरण झाली आहे.3 / 6गेल्या आठवड्यात २३ मार्च ते २७ मार्चदरम्यान किमतीत पुन्हा काही प्रमाणात वाढ दिसून आली. या पाच दिवसांच्या कालावधीत सोन्याचा भाव ८,५७४ रुपयांनी, तर चांदी ६३८७ रुपयांनी वधारल्याचे दिसून आले.4 / 6मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात तेल संकट निर्माण झाले आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत. यामुळे सोन्याची मागणी वाढली असून किमतीतही वाढ होताना दिसत आहे.5 / 6भारतात लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. लग्नसराईमुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्या-चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असून, यामुळे आगामी काळात किमती पुन्हा वाढण्याचे संकेत आहेत.6 / 6मोठ्या घसरणीनंतर आता किमती पुन्हा हळूहळू वाढू लागल्या आहेत. त्यामुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे.