Gold Silver Price Today: सोनं महागलं, चांदीच्या किंमतही वाढली, पटापट चेक करा, लेटेस्ट रेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 16:41 IST2023-06-06T16:21:55+5:302023-06-06T16:41:46+5:30

Gold Silver Price Today: गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी झाली होती.

गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ६०,६५० रूपयांवर व्यवहार करत आहेत. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ५५,३०० रुपये इतके आहे.

तर १ किलो चांदीचा दर ७३,५०० रूपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. मात्र, हे केंद्रीय पारितोषिक आहे. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्ज लावून त्याची विक्री करतो.

बाजारातील किंमत शुद्ध धातूची आहे. हा दागिन्यांचा दर नाही. म्हणूनच कोणताही दुकानदार तुमच्याकडून दागिन्यांच्या वजनावर जीएसटी आणि सेवा शुल्क आकारतो, ज्यामुळे तुमचे दागिने बाजारभावापेक्षा जास्त पोहोचतात.