विक्रमी पातळीवर पोहोचलं सोनं, जवळपास 3000 रुपयांनी घसरली चांदी; पटापट चेक करा सेन्या-चांदीचे लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:24 IST2025-12-15T15:18:50+5:302025-12-15T15:24:59+5:30

सोन्याच्या किमतीतील या विक्रमी वाढीमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष आता या मौल्यवान धातूकडे लागले आहे.

आज भारतीय सर्राफा बाजारात सोन्याच्या दरांनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ७३२ रुपयांनी वधारले असून, जीएसटीसह सोन्याचा भाव ₹ १,३७,४४५ पर्यंत पोहोचला आहे. तर, दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

सोमवारी जीएसटीशिवाय २४ कॅरेट सोने ₹ १,३३,४४२ प्रति १० ग्रॅमवर खुले झाले. या वर्षात आतापर्यंत सोन्याने ₹ ५७,७०२ रुपयांची मोठी झेप घेतली आहे.

चांदीच्या दरात मोठी घसरण: आज चांदीच्या दरात प्रति किलो ₹ २,९५८ रुपयांची मोठी घसरण दिसून आली. जीएसटीशिवाय चांदी ₹ १,९२,२२२ प्रति किलोवर खुली झाली. तर जीएसटीसह हा दर ₹ १,९७,९८८ पर्यंत पोहोचला आहे.

शुक्रवारी चांदीचा दर ₹ १,९५,१८० (ऑल टाइम हाय) प्रति किलो होता. सध्या चांदीचा दर तिच्या 'ऑल टाईम हाय'च्या तुलनेत ₹ २,९५८ ने कमी झाला आहे. तसेच, सोन्याचा दर जिएसटीशिवाय 132710 रुपये प्रति 10 ग्रामवर बंद झाला होता.

कॅरेटनुसार सोन्याचे दर (जीएसटीसह): आज २३ कॅरेट सोन्याचा दर ₹ ७२९ रुपयांची वधारला असून ₹ १,३६,८९५ प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ₹ ६७१ रुपयांची वाढून ₹ १,२५,८९९ प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.

याशिवाय, १८ कॅरेट सोन्याचा दर ₹ ५४९ रुपयांची वाढून ₹ १,०३,०८४ प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तसेच, १४ कॅरेट सोने ₹ ८०,४०५ प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहे.

सोन्याच्या किमतीतील या विक्रमी वाढीमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष आता या मौल्यवान धातूकडे लागले आहे. इंडिया बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशन (IBJA) दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता, असे दिवसातून दोनवेळा दर जाहीर करते.