Gold Rate Today : आनंदाची बातमी! सोनं-चांदी झालं स्वस्त; तुमच्या शहरातील लेटेस्ट दर तपासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 03:41 PM2023-12-30T15:41:23+5:302023-12-30T15:45:50+5:30

वर्षाच्या अखेरीस सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्या -चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सकाळीच सोनं ३५० रुपयांनी स्वस्त झालं आहे.

२८ डिसेंबर रोजी सोन्याचे दर ६४,२५० रुपये होतं. शुक्रवारी पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली. आता वर्षाच्या अखेरीस मात्र सोन्याच्या आणि चांदीच्याही दरात मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे.

काल शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमती ३५० रुपयांनी घसरल्या आहेत.आज सलग दुसऱ्या दिवशीही दरात घसरण झाली. देशातील अनेक शहरात सोनं ६३,८७० रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत पोहोचले आहे.

आज २२ कॅरेट सोन्याचा दर ५८,५५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. दरम्यान, २८ डिसेंबर रोजी सोन्याच्या दराने मोठा उच्चांक गाठला होता.

आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ५८,७०० रुपये आहे. तसेच २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,९७० रुपये आहे.

मुंबईत सोन्याची किंमत रु. ६३८७० १० ग्रॅम आणि चांदीची किंमत ७८,३०० रुपये किलो आहे.

कोलकातामध्ये सोन्याची किंमत ६३,८७० रुपये १० ग्रॅम आणि चांदीची किंमत ७८,३०० रुपये प्रति किलो आहे.

आपल्या देशात सोन्या-चांदीच्या किंमतीत रोज रोज बदल होत असतो. इस्त्रायल हमास युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ सुरू आहे, पण आता नव्या वर्षाच्या पूर्वसंधेला सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसत आहे.

मिस्ड कॉलद्वारे तुम्ही सोन्या-चांदीची किंमत देखील तपासू शकता. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. काही वेळात तुम्हाला एसएमएसद्वारे दराची माहिती मिळेल. तुम्ही अधिकृत वेबसाइट ibjarates.com वर जाऊन सकाळ आणि संध्याकाळचे सोन्याचे दर अपडेट जाणून घेऊ शकता.