खूशखबर! महिला दिनी सोन्याच्या दरात झाली घसरण, झटपट जाणून घ्या दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 05:44 PM2021-03-08T17:44:49+5:302021-03-08T17:51:48+5:30

Gold Rate Today, 8th March 2021: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (International Womens Day 2021) पार्श्वभूमीवर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. जाणून घ्या आजचा लेटेस्ट दर...

सोन्याच्या दरात सोमवारी घसरण झाली असून दिल्लीच्या सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा दर १२२ रुपयांनी कमी झाला आहे. दिल्लीत सोन्याचा आजचा दर ४४ हजार ११४ रुपये इतका आहे.

मल्टी कमॉडिटी एक्चेंजवरही (एमसीएक्स) सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एप्रिलच्या वायदा बाजारात सोन्याच्या दरात ३३५ रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटच्या माहितीनुसार मुंबई आणि पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा दर ४३ हजार ६८० रुपये इतका झाला आहे. तर २४ कॅरेट सोन्यासाठी ४४ हजार ६८० रुपये मोजावे लागतील.

देशात केरळ, हैदराबाद, बंगळुरूमध्ये सर्वात कमी म्हणजे ४२ हजार रुपये सोन्याचा दर आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचं बोललं जात आहे.

१ फेब्रुवारी रोजी २२ कॅरेट सोन्याचा दर ४८ हजार ४५० रुपये इतका होता. तर २८ फेब्रुवारीपर्यंत तो घसरुन ४४ हजार ९३० रुपयांपर्यंत आला.

एकट्या फेब्रुवारी महिन्यात सोन्याच्या दरात ७.२७ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे.