Gold Price Today: सोनं विक्रमी दरापेक्षा आज तब्बल ९ हजारांनी स्वस्त, जाणून घ्या लेटेस्ट दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 01:20 PM2021-08-17T13:20:55+5:302021-08-17T13:29:16+5:30

Gold Price Today, 17th Augest 2021: सोनं खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याचा आजचा दर नेमका किती आहे? जाणून घ्या...

सोन्याच्या दरात आज किंचित घट नोंदविण्यात आली आहे. एमसीएक्सवर आज सोन्याचा दरात ऑक्टोबरसाठीचा भाव ०.०३ टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळाला.

दुसऱ्या बाजूला चांदीच्या दरात मात्र वाढ नोंदविण्यात आली आहे. सप्टेंबरसाठीच्या चांदीच्या दरात ०.२४ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत ४५,६०० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी म्हणजेच चार महिन्यांच्या निचांकावर आली होती. त्यानंतर थोडी सुधारणा झाली आणि सद्या सोन्याची किंमत ४७ हजार रुपये इतकी आहे.

गेल्या वर्षी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ५६,२०० रुपये इतका नोंदवला गेला होता. आज एमसीएक्सवर सोन्याचा दर १३ रुपयांनी कमी होऊन ४७ हजार २१२ रुपये इतका आहे.

एमसीएक्सवर चांदीच्या वायदा दरात १५३ रुपयांची वाढ होऊन प्रतिकिलो ६३,६१० रुपये इतका झाला आहे.

सोन्याच्या दरात आगामी काळात मोठी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोनानंतर आर्थिक सुधारणेला गती मिळताना दिसत आहे. अशावेळी फेडरल रिझर्व्हकडून वेळेआधीच व्याजदर वाढवले जाऊ शकतात, असं यूबीएस ग्रूपच्या कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यूबीएस ग्रूपने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं १६०० डॉलर आणि चांदी २२ डॉलरच्या पातळीवर येऊ शकते.

सोमवारी देखील सोन्याच्या दरात किंचित घट नोंदविण्यात आली होती. तर चांदीच्या दरात ५०५ रुपयांची घट नोंदविण्यात आली होती. सोनं ४२ रुपयांनी घसरून ४५,९६० रुपयांवर बंद झालं होतं. तर चांदी ६१,४६९ रुपये प्रतिकिलोवर बंद झालं होतं.