सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 20:56 IST2025-05-03T20:42:09+5:302025-05-03T20:56:38+5:30

अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेले व्यापार युद्ध काहीसे थंड पडल्याने, सोन्याचा दर घसरल्याचे मानले जात आहे.

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण दिसून आली आहे. सोन्याचा दर त्याच्या विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत, प्रति १० ग्रॅम ६६५८ रुपयांनी घसरला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेले व्यापार युद्ध काहीसे थंड पडल्याने, सोन्याचा दर घसरल्याचे मानले जात आहे.

शुक्रवारी एमसीएक्सवर १० ग्रॅम सोन्याची किंमत ९२,७०० रुपये होती. जी प्रति १० ग्रॅम ९९,३५८ रुपयांच्या विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत ६६५८ रुपये स्वस्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस ३२४०.८८ रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी, कॉमेक्स गोल्ड प्रति औंस ३२५७ रुपयांवर बंद झाले. भविष्यात सोने आणखी स्वस्त होणार की महागणार? जाणून घेऊया...

काय म्हणतायत तज्ज्ञ? - बाजारातील तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेले व्यापार युद्ध थंड पडल्याने आणि अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोन्याचे दर घसरले आहेत. यूएस डॉलर इंडेक्स 98 वर गेल्यानंतर, पुन्हा एकदा बाउंस बॅक करण्यात यशस्वी ठरला. माध्यमांतील वृत्तांनुसार, अमेरिका चीनवर लादलेले टॅरिफ कमी करू शकतो. अशा प्रकारची बातमी समोर आल्यानंतर, डॉलर मजबूत होत आहे. तसेच सोन्याच्या तेजीला हा धक्का आहे.

एलकेपी सिक्योरिटीजशी संबंधित जतिन त्रिवेदी यांनी म्हटले आहे की, "अनिश्चिततेच्या काळात सोन्याचा दर 92000 रुपये ते 94500 रुपये प्रति 10 ग्रॅम दरम्यान ट्रेड करू शकतो."

वेल्थस्ट्रीटच्या सुगंधा सचदेव यांच्या मते, "अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या ट्रेड वॉरच्या स्थितीत सुधारणा होत आहे. मात्र, अनिश्चिततेमुळे एक सुरक्षित गुंतवणूक कायम राहील. सध्यस्थितीत सोन्याचा दर 91,700 रुपयांच्या पातळीवर सपोर्ट प्राप्त करत आहे. तसेच, 96500 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर रेसिसटेन्स दाखवत आहे."

राजधानी दिल्लीचा विचार करता दिल्लीत सोन्याचा दर 92650 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढे आहे. तर मुंबईमध्ये सोन्याचा दर 92,810 रुपये प्रति 10 ग्रॅम एढा आहे.

(टीप - हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत असतो. यामुळे कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.)