सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 13:36 IST2025-12-23T13:24:30+5:302025-12-23T13:36:04+5:30
आज सोन्या-चांदीचा दर All-Time High वर पोहोचला आहे...

ना लग्नसराई, ना कुठला मोठा सण, तरीही सर्राफा बाजारात सोन्या-चांदीचे दर गगणाला भीडले आहेत. आज या दोन्ही धातूंच्या दरांनी नवा विक्रम अथवा रेकॉर्ड नोंदवला आहे. आज सोन्या-चांदीचा दर All-Time High वर पोहोचला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चांदीची किंमत १५२३ रुपये प्रति किलोने वधारली आहे, तर सोन्याची किंमत २१६३ रुपये प्रति १० ग्रॅमने वधारला आहे.

आता जीएसटीसह (GST) चांदी २१५५२७ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १४०२१६ रुपये प्रति १० ग्रॅम या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला आहे.

सोमवारी जिएसटी शिवाय, चांदी 207727 रुपये प्रति किलो तर सोने 133970 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. आज जीएसटीशिवाय, सोने 136133 रुपयांच्या ऑल टाइम हायवर खुले झाले, तर चांदी 209250 रुपये प्रति किलोवर खुली झाली.

या वर्षांत आतापर्यंत सोन्याचा दर 60393 रुपयांनी, तर चांदी 123233 रुपयांपर्यंत वधारला आहे. सोमवारी हे दोन्ही धातू नव्या उच्चांकावर होते. मात्र आज तो रेकॉर्डही तुटला आहे.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ही दरवाढ केवळ स्थानिक मागणीवरच नव्हे, तर जागतिक घडामोडींचाही परिणाम आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह २०२६ मध्ये दोनवेळा व्याज कपात करण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नरमाईचे मौद्रिक धोरण, यांमुळेही जागतिक बाजारात सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे.

या आर्थिक वर्षात आतापर्यंत सोने ६०,३९३ रुपयांनी, तर चांदी तब्बल १,२३,२३३ रुपयांनी वधारली आहे.

कॅरेटनिहाय सोन्याच्या दराचा विचार करता जीएसटीसह, २३ कॅरेट सोने १३९६५५ रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोने १२८४३८ रुपये प्रति १० ग्रॅम, १८ कॅरेट सोने १०५१६३ रुपये प्रति १० ग्रॅम तर १४ कॅरेट सोने ८२०२७ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे.

हे सर्व दर आयबीजेएने जारी केले आहेत. आयबीजेएकडून दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता, असे दिवसातून दोन वेळा हे दर जारी केले जातात...

















