शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gold and Silver Price: सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा जोरदार तेजी येण्याची शक्यता; काय आहेत यामागील कारणं? एक्सपर्ट म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 09:10 IST

1 / 6
Gold and Silver Price: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार दिसून येत आहे. त्यातच आता लग्नसराईच्या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. त्यामुळे सोन्याच्या किमतीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. येत्या काळात सोन्या-चांदीच्या पुन्हा एकदा जोरदार तेजी येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
2 / 6
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक टॅरिफ (आयात शुल्क) वाढवण्याचा घेतलेला निर्णय आणि पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव यामुळे व्यापारात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्या-चांदीला पसंती दिली असून, या आठवड्यात मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
3 / 6
बाजारपेठेतील जाणकार आता अमेरिकेचा उत्पादक मूल्य सूचकांक, लोकांचा आर्थिक विश्वास, साप्ताहिक बेरोजगारीचे दावे आणि चीनच्या मध्यवर्ती बँकेचा व्याजदराचा निर्णय यांसारख्या महत्त्वाच्या आर्थिक आकडेवारीवर लक्ष ठेवून आहेत. चॉईस ब्रोकिंगच्या मते, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी जागतिक आयात शुल्क वाढवल्यामुळे आणि भू-राजकीय जोखमींमुळे जागतिक व्यापारात अनिश्चितता निर्माण झाली आहे.
4 / 6
परिणामी, गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने आणि चांदीकडे वळले आहेत. गेल्या आठवड्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीच्या किमतीत ८,५८४ रुपये म्हणजेच ३.५ टक्क्यांची वाढ झाली, तर सोन्याच्या किमतीत सुमारे ९८१ रुपये म्हणजेच १ टक्क्याची वाढ नोंदवण्यात आली.
5 / 6
एंजेल वनचे प्रथमेश माल्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारीपर्यंत सोन्याच्या किमती एका मर्यादित कक्षेत राहिल्या होत्या. एमसीएक्सवर सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.५ लाख ते १.६ लाख रुपयांच्या दरम्यान बदलत होता. मात्र, अमेरिकेची कमकुवत आर्थिक आकडेवारी आणि वाढत्या भू-राजकीय जोखमींमुळे सोन्याच्या किमतींना पाठबळ मिळालं आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांनी फेडरल रिझर्व्हकडून होणाऱ्या संभाव्य व्याजदर कपातीचा विचारही केंद्रस्थानी ठेवला आहे.
6 / 6
पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती, रशिया-युक्रेन युद्ध आणि बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार अनिश्चितता टाळण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त झाले आहेत. या आठवड्यात मौल्यवान धातूंमध्ये जोखीम टाळण्याची भावना प्रबळ राहिली आहे. या सर्व घडामोडी पाहता, सोन्याच्या किमती प्रति १० ग्रॅम १.६१ लाख रुपयांपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज माल्या यांनी व्यक्त केलाय.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पTrade Tariff Warटॅरिफ युद्ध