सोन्याचे दागिने खरेदीला जाताय? 3 गोष्टींची काळजी घेतल्यास बक्कळ पैसे वाचतील

By हेमंत बावकर | Published: October 29, 2020 05:29 PM2020-10-29T17:29:00+5:302020-10-29T17:37:09+5:30

Gold Jewelry Purchase : उत्सवी काळातच नाही तर नेहमीच्या खरेदीवेळी तुम्ही काही गोष्टींचा काळजी घेण्याची गरज आहे. यामुळे तुम्ही योग्य दरात दागिने खरेदी करू शकता. सोनार तुम्हाला फसवू शकत नाही.

देशात सध्या उत्सवाचा काळ आहे. मात्र, दुसरीकडे सोने कमालीचे महाग झाले आहे. सोन्याच्या दरांनी पन्नास हजारांचा टप्पा ओलांडलेला आहे. यामुळे लग्न, वाढदिवस आदी कार्य़क्रम सोडा मुहूर्तालाही सोने खरेदी करणे म्हणजे खिसा रिकामा करणे असेच झाले आहे.

देशात उत्सवी काळात सोन्याची खरेदी 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. घरात लग्नकार्य, मुला-मुलींचा वाढदिवस तसेच सणांवेळी दागिन्यांची खरेदी करण्याच्या तयारीत अनेकजण आहेत.

या खरेदीवेळी तुम्ही काही काळजी घेतली तर पैसे वाचवू शकणार आहात. दागिने खरेदी करताना तुमच्याकडे लक्ष्मी येईल, कसे ते पहा...

या उत्सवी काळात जर तुम्ही काही गोष्टींचा काळजी घेण्याची गरज आहे. यामुळे तुम्ही योग्य दरात दागिने खरेदी करू शकता. सोनार तुम्हाला फसवू शकत नाही.

जर तुम्ही ऑनलाईन दागिने खरेदी केले तर या प्रकारची समस्या कमी येते. मात्र, जर तुम्ही ज्वेलरी शॉपमध्ये दागिने खरेदी करणार असाल तर जास्त सतर्क राहणे गरजेचे आहे.

सोन्याचा दर हा दागिन्याचे वजन आणि कॅरेटच्या हिशोबाने वेगवेगळा असतो. मात्र, जेव्ह तुम्ही दागिने खरेदी करता तेव्हा बिलामध्ये सोनाराने कोणते कोणते चार्ज लावले आहेत ते पहावे लागणार आहे.

अनेकदा ज्वेलर्स ग्राहकांना फसविण्यासाठी बिलामध्ये अनेक प्रकारचे चार्ज लावतात. मात्र, ग्राहकाला माहिती नसल्याने त्याला ते कळतही नाही व शांत बसावे लागते.

केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार ग्राहकाला केवळ तीन गोष्टींचे पैसे द्यायचे असतात. पहिली सोन्याच्या दागिन्यांचे वजनानुसार किंमत, दुसरा मेकिंग चार्ज आणि तिसरा जीएसटी तो देखील 30 टक्के.

दागिने खरेदीचे पैसे तुम्ही ऑनलाईन भरा किंवा ऑफलाईन जीएसटी केवळ 3 टक्केच द्यावा लागतो.

या तीन चार्जेसशिवाय ज्वेलरने अन्य कोणता चार्ज आकारल्यास तुम्ही त्याला हटकू शकता. काही ज्वेलर्स लेबर चार्ज, पॉलिश वेटच्या नावावर जास्त पैसे आकारतात. हे चुकीचे आहे. हे पैसे मुळीच देऊ नकात. या ज्वेलरची तुम्ही तक्रारही करू शकता.

तुम्हाला माहिती असण्यापैकी आणखी एक गोष्ट म्हणजे सोन्याचे दागिने हे 24 कॅरेटचे बनत नाहीत. बाजारात उपलब्ध असलेले दागिने हे 22 किंवा 18 कॅरेटचे आसतात. खरेदीवेळी याकडे लक्ष ठेवावे. या दिवशीच्या सोन्याच्या दरांवरही लक्ष ठेवावे. यामुळे तुम्ही योग्य दराने दागिने खरेदी करू शकता.

महत्वाचे म्हमजे मेकिंग चार्जेसवर घासाघीस जरूर करावी. बहुतांश ज्वेलर यानंतर मेकिंग चार्जेस कमी करतात. दागिन्यांवर 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज घेतला जातो. सोनारांचा जास्त फायदा त्यातच आहे.

नेहमी ओरिजिनल बिल घ्यावे. पुढे दागिने विकताना आणि शुद्धता तपासताना, वजनावेळी त्याची गरज लागते. शुद्धतेसाठी हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करावेत.

हॉलमार्कवर पाच आकडे असतात. 22 कॅरेटच्या दागिन्य़ावर 916 आकडा. 21 कॅरेटच्या सोन्यावर 875, 18 कॅरेटच्या सोन्यावर 750 हा आकडा लिहिलेला असतो.

टॅग्स :सोनंGold