Income Tax पासून FD पर्यंत, या महिन्यात आहेत ६ डेडलाइन्स, नंतर पश्चाताप करायचा नसेल तर आताच चेक करा

By जयदीप दाभोळकर | Updated: March 7, 2025 08:43 IST2025-03-07T08:29:12+5:302025-03-07T08:43:37+5:30

Investment March Deadlines: मार्च २०२५ हा महिना तुमच्यासाठी पैशांशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठीचा महत्त्वाचा महिना ठरू शकतो. ही डेडलाइन चुकल्यास तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं.

Investment March Deadlines: मार्च २०२५ हा महिना तुमच्यासाठी पैशांशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठीचा महत्त्वाचा महिना ठरू शकतो. कर बचतीपासून ते विशेष मुदत ठेवींमध्ये (FD) गुंतवणूक करण्यापर्यंत अनेक महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण करावी लागतात. ही डेडलाइन चुकल्यास तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. चला तर मग जाणून घेऊया मार्च २०२५ च्या काही महत्त्वाच्या मनी डेडलाईन्स.

जर तुम्ही जुन्या करप्रणालीचा पर्याय निवडला असेल तर ३१ मार्च २०२५ पूर्वी करबचतीसाठी गुंतवणूक करा. इन्कम टॅक्स अॅक्टअंतर्गत तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS), एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड (EPF), पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट (५ वर्षांच्या लॉक-इन पीरियडसह) आणि इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) मध्ये गुंतवणूक करू शकता.

जर तुम्ही आधीच्या आयटीआरमध्ये चूक केली असेल किंवा कोणतंही उत्पन्न चुकलं असेल तर तुम्ही ३१ मार्च २०२५ पर्यंत अपडेटेड रिटर्न (ITR-U) भरू शकता. संबंधित मूल्यांकन वर्षानंतर आपल्याला दोन वर्षांपर्यंत आयटीआर-यू भरण्याची संधी मिळते.

जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (EPF) सदस्य असाल तर १५ मार्च २०२५ पर्यंत तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) अॅक्टिव्हेट करा. यामुळे तुम्ही तुमचं पीएफ खातं ऑनलाइन मॅनेज करू शकता आणि एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) योजनेअंतर्गत ७ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळवू शकता.

एसबीआयची अमृत वृष्टी एफडी ही ४४४ दिवसांची मुदत असलेली विशेष योजना आहे, ज्यामध्ये सामान्य नागरिकांना ७.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याज मिळतं. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे. एसबीआय अमृत कलश एफडी ही ४०० दिवसांची मुदत असलेली एफडी योजना आहे, ज्यामध्ये सामान्य नागरिकांना ७.१०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.६०% व्याज मिळते.

आयडीबीआय बँकेची उत्सव एफडी ही एक विशेष एफडी योजना आहे, ज्यामध्ये मॅच्युरिटी पीरियडनुसार व्याजदर बदलतात. यामध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे.

इंडियन बँकेच्या दोन खास एफडी योजना आहेत. इंडियन बँकेच्या आयएनडी सुप्रीम ३०० डेज आणि आयएनडी सुपर ४०० डेज योजनांमध्ये अतिज्येष्ठ नागरिकांना ८.०५% पर्यंत व्याज दिलं जात आहे. यामध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे.