पहिलं प्रेम, रजनीकांतच्या ताफ्यात अद्यापही 'पद्मिनी'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 05:00 PM2020-01-27T17:00:10+5:302020-01-27T17:06:46+5:30

रजनीकांत म्हणजे सुपरस्टार, पण तितकाच साधेपणा जपणारा अभिनेता होय. दाक्षिणात्य सिनेमांचा हा थलैवा गर्भश्रीमंत आहे. थलैवाकडे पॉश आणि ब्रँडेड कारची कमतरता नाही, तरीही त्याच्या गॅरेजमध्ये जुन्या मोडकळीस आलेल्या गाड्याही तुम्हाला पाहायला मिळतील.

रजनीकांत यांच्या गाड्यांच्या ताफ्यात प्रिमियर पद्ममीनी अद्यापही दिमाखात आहे. पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम.. असं आपण म्हणतो त्याचंच हे उदाहरण म्हणता येईल.

सन 1980 च्या दशकात रजनीकांत यांनी ही फिएट कंपनीची कार खरेदी केली होती. त्यावेळी, नुकतेच त्यांचे चित्रपटसृष्टीत नाव झाले होते.

जुन्या ऑक्सफोर्ड सिरीज 3मधील अम्बेसिडर कारही रजनीकांत यांनी खरेदी केली होती. देशातील उच्चपदस्थ नेते या कारचा वापर करत होते.

रजनीकांत यांच्याजवळ जुन्या पिढीतील होंडा सिविक 1.8 लिटर पेट्रोल इंजिनवाली कार आहे, जी 130 बीएचपीची पॉवर देते.

तसेच, रजनीकांत यांच्याकडे जुन्या पिढीतील इनोवा कारही आहे. या कारची किंमत जवळपास 15 लाख रुपये आहे.

जुन्या कारच्या ताफ्यांसह रजनीकांत यांच्याकडे अत्याधुनिक BMW X5 कार आहे. या कारची किंमत जवळपास 80 लाख रुपये आहे.

रजनीकांतचा साधारण कारपासून ते असाधारण कारपर्यंतचा प्रवास लक्षणीय आहे. थलैवाकडे मर्सिडीज बेंज-जीक्लास, रॉल्स रॉयस पँटम, कॉल्स रॉयस आणि कस्टम बिल्ट लिमोजीन याही अलिशान गाड्या आहेत. याची किंमत 22 कोटी रुपये आहे.