By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 15:40 IST
1 / 13१ एप्रिल २०२६ पासून 'आयकर कायदा २०२५' लागू होत असल्याने, आर्थिक गणिते मांडताना अधिक सतर्क राहावे लागेल. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी हे महिनानिहाय कॅलेंडर तुम्हाला दिशादर्शक ठरेल.2 / 13एप्रिल - नव्या टॅक्स रिजीमची निवड करून सुरुवात करा. विमा आढावा घेत व टीडीएस टाळण्यासाठी 'फॉर्म १५जी/एच' जमा करा. सोन्यात गुंतवणूक करताना दीर्घकालीन विचार करा.3 / 13मे - आयटीआर साठी सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट गोळा करण्यास सुरुवात करा. गृहकर्जाच्या व्याजाबाबत बँकेशी बोलणी करण्यासाठी, 'इमर्जन्सी फंड' साठी ही उत्तम वेळ आहे.4 / 13जून - १५ जूनपर्यंत अॅडव्हान्स टॅक्सचा पहिला हप्ता भरा. कंपनीकडून 'फॉर्म १३०' (नवा फॉर्म १६) मिळवा. सर्व गुंतवणुकीतील 'नॉमिनेशन' तपासा.5 / 13जुलै - आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे, त्यामुळे विनाविलंब फाईलिंग करा. सोबतच आपला क्रेडिट स्कोअर तपासून त्रुटी दूर करा.6 / 13ऑगस्ट - भविष्यातील वारसा हक्कासाठी 'मृत्युपत्र' (विल) तयार करा. आगामी सणासुदीच्या काळासाठी आतापासूनच बजेट आखून बचतीवर भर द्या.7 / 13सप्टेंबर - १५ सप्टेंबरपर्यंत अॅडव्हान्स टॅक्सचा दुसरा हप्ता भरा. गुंतवणुकीचा आढावा घेऊन महागड्या कर्जाची परतफेड करण्याला प्राधान्य द्या.8 / 13ऑक्टोबर - दिवाळीच्या सेलमध्ये अनावश्यक खर्च टाळा, ज्येष्ठ नागरिकांनी व्यातीचा दाखला जमा करावा. रोने खरेदी करताना ज्वेलर्सच्या डेजिटल गोल्ड योजनांमधील जोखीम तपासा.9 / 13नोव्हेंबर - टॅक्स सेव्हिंगसाठी मार्चची वाट न पाहता आतापासूनच गुंतवणूक सुरू करावी. पेन्शनधारकांनी आपले 'लाईफ सर्टिफिकेट' वेळेत सादर करावे. ते आता मोबाईलवरूनही होते.10 / 13डिसेंबर - १५ डिसेंबरपर्यंत अॅडव्हान्स टॅक्सचा तिसरा हप्ता भरा. ३१ डिसेंबर ही आयकर विवरणपत्र सुधारण्याची (रिवाईज्ड रिटर्न) शेवटची संधी असेल, हे विसरू नका.11 / 13जानेवारी - १५ डिसेंबरपर्यंत अॅडव्हान्स टॅक्सचा तिसरा हप्ता भरा. ३१ डिसेंबर ही प्राप्तिकर विवरणपत्र सुधारण्याची (रिवाईज्ड रिटर्न) शेवटची संधी असेल, हे विसरू नका.12 / 13फेब्रुवारी - केंद्रीय बजेटमधील कर बदलांवर लक्ष ठेवा. जोडीदाराशी आर्थिक उद्दिष्टांवर चर्चा करा आणि प्रलंबित टॅक्स सेव्हिंग गुंतवणूक पूर्ण करा. यामुळे कर बचत होईल.13 / 13मार्च - १५ मार्चला अॅडव्हान्स टॅक्सचा शेवटचा हप्ता भरा. ३१ मार्च ही टॅक्स सेव्हिंगची अंतिम मुदत आहे. वर्षाअखेर मिळालेल्या 'बोनस'चा वापर कर्जातून मुक्त होण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी करा.