फेडचा निर्णय अमेरिकेत अन् सोनं-चांदी 'धडाम' भारतात! चांदी 2000 रुपयांनी स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:17 IST2024-12-19T13:02:56+5:302024-12-19T13:17:01+5:30

आज सकाळी बाजार खुला होताच सोन्याचा भाव 750 रुपये प्रति 10 ग्रॅमने खालच्या पातळीवर दिसून आला. तर चांदी 2150 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत स्वस्त झाली होती.

सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण बघायला मिळत आहे. आज सकाळी बाजार खुला होताच सोन्याचा भाव 750 रुपये प्रति 10 ग्रॅमने खालच्या पातळीवर दिसून आला. तर चांदी 2150 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत स्वस्त झाली होती.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर 75936 रुपये प्रति 10 ग्रामवर आला आहे. यात 717 रुपयांची अथवा 0.94 टक्क्यांची घसरण दुसून येत आहे. तर चांदी साधारणपणे 1980 रुपये अथवा 2.19 टक्क्यांनी घसरून 88,400 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली आहे.

फेडच्या नर्णयानंतर, सोनं-चांदी स्वस्त - जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसत आहे. ही घसरण फेडरल रिझर्व्हच्या दर कपातीच्या निर्णयानंतर आली आहे.

फेडरल रिझर्व्हने पॉलिसी रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे आणि यानंतर अमेरिकन बाजारापासून ते देशांतर्गत बाजारातही दबाव दिसत आहे. कमोडिटी मार्केटही या घसरणीच्या तडाख्यात सापडले आहे. याचा परिणाम सोन्या चांदीच्या दरांवर दिसून येत आहे.

आपल्या शहरातील सोन्या-चांदीचे दर - दिल्ली - 24 कॅरेट सोने 710 रुपयांनी स्वस्त होऊन 77,280 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. चेन्नई - 24 कॅरेट सोने 650 रुपयांनी स्वस्त होऊन 77,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे.

मुंबई - 24 कॅरेट सोने 650 रुपयांनी स्वस्त होऊन 77,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. कोलकाता - 24 कॅरेट सोने 710 रुपयांनी स्वस्त होऊन 77,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे.

'24 कॅरेट गोल्ड असते सर्वात शुद्ध - खरे तर 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते. शुद्ध सोने अथवा 24 कॅरेट सोने हे 99.9 टक्के शुद्धत असते. त्यात इतर कुठलाही धातू मिसळलेला नसतो. सोन्याची नाणी आणि बार तयार करण्यासाठी 24 कॅरेट सोन्याचा वापर होतो. सोन्याची शुद्धता ही 24 कॅरेटच्या तुलनेत मोजली जाते.

लक्षात असू द्या ही महत्वाची गोष्ट - जर आपण सोनं खरेदीसाठी बाजारात जात असाल तर हॉलमार्क बघूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता चेक करण्यासाठी आपण सरकारी अॅपचाही वापर करू शकता. ‘BIS Care app’ च्या माध्यमाने आपण सोन्याची शुद्धता चेक करू शकता. याशिवाय याच अॅपच्या माध्यमाने आपण तक्रारही करू शकता.