PF धारकांसाठी मोदी सरकारने दिली खुशखबर! तुम्हाला फायदा मिळाला का? फटाफट असं चेक करा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:25 PM2023-03-16T12:25:43+5:302023-03-16T12:28:44+5:30

PF धारकांसाठी मोदी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे.

PF धारकांसाठी मोदी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला पीएफच्या व्याजा संदर्भात मोदी सरकारने अपडेट दिली आहे.

प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्याच्या पगारातून काही रक्कम पीएफ खात्यात जमा होते. यात तेवढीच रक्कम केपनी जमा करत असते.

काही दिवसापूर्वी कर्मचारी भविष्य निधी खात्यात २०२१-२२ या वर्षातील सरकारने व्याज जमा केले नसल्याची बातमी समोर आली होती.

या वर्षात सरकारने हे ८.१ टक्क्यांनी देण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात काही खासदारांनी आणि कर्मचारी संघटनांनी आवाज उठवला होता. या संदर्भात आता केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसबेत उत्तर दिले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसबेत एक लिखित स्वरुपात उत्तर दिले आहे. 'ईपीएफ खात्यात व्याज जमा करणे ही एक प्रक्रिया आहे. नवीन सॉफ्टवेअर लागू झाल्यानंतर विहित पद्धतीनुसार व्याज जमा केले जात आहे. टीडीएसशी संबंधित नवीन नियमांमुळे पीएफ खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया संथ असल्याचेही त्यांनी या उत्तरात सांगितले.

आता २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे व्याज सरकारने सुमारे ९८ टक्के पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा केले आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी EPF वर ८.१ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आले होते.

जर तुम्हीही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले आहेत की नाही ते तपासा.

पहिल्यांदा EPFO ​​पोर्टल www.epfindia.gov.in वर जा. येथे ई-पासबुक पर्यायावर क्लिक करा. नवीन पेजवर UAN वर क्लिक करा आणि पासवर्ड भरा. खाली दिलेला कॅप्चा कोड एंटर करा आणि लॉगिन बटणावर क्लिक करा. लॉगिन केल्यानंतर, सदस्य आयडी पर्याय निवडा, येथे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात पासबुक मिळेल. यामध्ये नुकतेच आलेले व्याज इत्यादी रक्कम तपासू शकता.