EPFO Alert: आज दहा हजार काढा; उद्या लाखाचा फटका घ्या! पीएफमधून पैसे काढणे किती योग्य? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 11:15 AM2023-12-23T11:15:00+5:302023-12-23T11:20:07+5:30

अनेकदा असे दिसून आले आहे की, नागरिक क्षुल्लक कारणांसाठीही पीएफमधील पैसे काढून घेत असतात.

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधीतून (पीएफ) पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अनेकदा असे दिसून आले आहे की, नागरिक क्षुल्लक कारणांसाठीही पीएफमधील पैसे काढून घेत असतात.

मुदत पूर्ण होण्याआधीच असे पैसे काढल्याने मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेवर याचा होणारा परिणाम कुणीही विचारात घेत नाही. 

नोकरी गेल्यास महिन्याभराच्या अवधीनंतर त्या कर्मचाऱ्याला पीएफ खात्यातून ७५ टक्के रक्कम काढता येते. उर्वरित २५ टक्के रक्कम नोकरी गेल्यानंतर दोन महिन्यांनी काढता येते.

पीएफवर सध्या ८.१५ टक्के दराने व्याज मिळते. व्याजाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होत असते. त्यामुळे मिळणाऱ्या निवृत्ती निधीत तसेच पेन्शनच्या रकमेत वाढ होते असते. 

नोकरीतून निवृत्त होण्यासाठी ३० वर्षे असताना जर पीएफ खात्यातून १० हजार रुपये काढले तर निवृत्तीनंतर १ लाख १४ हजार रुपये कमी मिळतात. यापेक्षा अधिक पैसे काढल्यास त्या व्यक्तीचे अधिक नुकसान होते. 

कारण    अट    रक्कम 

घर खरेदी/बांधणे    सलग ५ वर्षांची नोकरी    पगाराच्या २४ ते ३६ पट; आरोग्य उपचार    अट नाही    मासिक वेतनाच्या ६ पट इतकी

गृहकर्ज फेड    सलग ३ वर्षांची नोकरी    ९० टक्के रक्कम; घरदुरुस्ती    सलग ५ वर्षांची नोकरी    मासिक पगाराच्या १२ पट इतकी

विवाह    सलग ५ वर्षांची नोकरी    व्याजासह कर्मचाऱ्यांच्या योगदानाच्या ५०% इतकी