घसरणाऱ्या बाजारातही 'हे' ५ म्युच्युअल फंड थाटात उभे! ४० टक्क्यांपर्यंत बंपर परतावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:03 IST2025-01-14T13:52:01+5:302025-01-14T14:03:01+5:30
Mutual Fund : बाजारातील या सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे म्युच्युअल फंड पोर्टफोलिओही उद्ध्वस्त झाले आहेत. दरम्यान, या विनाशकारी बाजारातील मंदीतही, अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवले आहेत.

गेल्या २ महिन्यांपासून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना रात्रीची झोप नीट लागत नसेल. बाजारात घसरणीचा ट्रेंड कायम आहे. मात्र, मंगळवारी बाजारात तुरळक रिकव्हरी दिसून येत आहे. सोमवारी BSE सेन्सेक्स १०४८.९० अंकांच्या घसरणीसह ७६,३३०.०१ अंकांवर बंद झाला. दुसरीकडे NSE निफ्टीही ३४५.५५ अंकांनी घसरून २३,०८५.९५ अंकांवर बंद झाला. सातत्याची घसरण पाहून गुंतवणूकदार हैराण झाले आहेत. मात्र, अशा परिस्थितही काही म्युच्युअल फंडांनी ४० टक्केपर्यंत बंपर परतावा दिला आहे.
यूटीआय हेल्थकेअर फंड गेल्या एका वर्षात सर्वाधिक परतावा देणाऱ्या क्षेत्रीय म्युच्युअल फंडांच्या यादीत ५व्या स्थानावर आहे. AMFI डेटानुसार, या फंडाच्या थेट योजनेने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना ३२.८३ टक्के परतावा दिला आहे.
एलआयसी एमएफ हेल्थकेअर फंड यादीत चौथ्या स्थानावर आहे. या फंडाच्या थेट योजनेने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना ३३.१८ टक्के परतावा दिला आहे.
SBI चा हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांच्या थेट योजनेने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना ३५.६१ टक्के परतावा दिला आहे.
ICICI प्रुडेंशियल फार्मा हेल्थकेअर अँड डायग्नोस्टिक्स फंड या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या फंडाच्या थेट योजनेने गेल्या १ वर्षात ३५.८७ टक्के परतावा दिला आहे.
एचडीएफसी फार्मा आणि हेल्थकेअर फंड गेल्या एका वर्षात सर्वाधिक परतावा देणाऱ्या सेक्टरल म्युच्युअल फंडांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या थेट योजनेने गेल्या १ वर्षात ३९.८३ टक्के परतावा दिला आहे.