Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 09:03 IST
1 / 6Post Office Saving Schemes: पोस्ट ऑफिस (India Post) केवळ टपाल सेवाच नव्हे, तर बँकिंगशी संबंधित सेवा देखील प्रदान करतं. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी (RD), टीडी (TD), एमआयएस (MIS), एससीएसएस (SCSS), पीपीएफ (PPF), एसएसए (SSA), केव्हीपी (KVP) यांसारख्या विविध बचत योजनांतर्गत खाती उघडता येतात. 2 / 6पोस्ट ऑफिसच्या टीडी (जी बँकांच्या एफडी खात्यांसारखी आहे) सध्या बँकांच्या एफडीपेक्षा जास्त व्याज मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका योजनेबद्दल सांगत आहोत, ज्यात तुम्ही फक्त १ लाख रुपये जमा करून ४४,९९५ रुपये इतकं मोठं व्याज मिळवू शकता.3 / 6पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी एफडी (टाइम डिपॉझिट) करता येते. पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्षाच्या एफडीवर ६.९%, २ वर्षांच्या एफडीवर ७.०%, ३ वर्षांच्या एफडीवर ७.१% आणि ५ वर्षांच्या एफडीवर ७.५% इतका मोठा व्याज मिळत आहे. 4 / 6 देशातील कोणतीही बँक इतका व्याज देत नाही. पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत किमान १००० रुपये जमा करता येतात, तर कमाल ठेवीची कोणतीही मर्यादा नाही. पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीममध्ये सिंगल अकाउंट सोबतच जॉइंट अकाउंट देखील उघडता येतात. जॉइंट खात्यात जास्तीत जास्त ३ लोकांना सामील केलं जाऊ शकतं.5 / 6पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना ५ वर्षांच्या कालावधीच्या एफडी योजनेवर सर्वात जास्त ७.५% व्याज देत आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये ५ वर्षांच्या (म्हणजे ६० महिने) एफडी योजनेत १ लाख रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण १,४४,९९५ रुपये मिळतील, ज्यात ४४,९९५ रुपये निश्चित व्याजाचा समावेश आहे. 6 / 6पोस्ट ऑफिस थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करते, ज्यामुळे तुम्हाला सरकारी गॅरंटी सह मॅच्युरिटीवर व्याजाचे निश्चित पैसे मिळतात. लक्षात ठेवा की पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत सर्व ग्राहकांना समान व्याज मिळते, तर बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना काही निवडक कालावधीच्या एफडीवर ०.५०% जास्त व्याज मिळते.