Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 09:24 PM2021-10-12T21:24:40+5:302021-10-12T21:32:42+5:30

Credit Card : बर्‍याच ठिकाणी, क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यावर विशेष सवलत देखील उपलब्ध आहे आणि लोक त्याचा प्रचंड फायदा घेतात.

सध्या सणासुदीचा काळ सुरू झाला आहे आणि या काळात विविध प्रकारच्या कंपन्या लोकांना सर्व प्रकारच्या खरेदीवर बंपर सवलत देतात. बर्‍याच ठिकाणी, क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यावर विशेष सवलत देखील उपलब्ध आहे आणि लोक त्याचा प्रचंड फायदा घेतात. बरेच लोक असे आहेत, जे सवलत पाहण्याच्या नादात, हे देखील विसरतात की त्यांची क्षमता किती आहे, म्हणजे ते किती मर्यादेपर्यंत खर्च करू शकतात.

अशा परिस्थितीत लोकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड देखील असेल, तर सर्वप्रथम तुम्ही विशेष काळजी घ्यावी की तुम्ही जेवढे पैसे देऊ शकता, तेवढ्याच रकमेची खरेदी करा.

बऱ्याचदा अनेकांना अशी सवय असते की, ते इतरांना पाहिल्यानंतर स्वतःहून लक्झरी वस्तू विकत घेतात आणि नंतर क्रेडिट कार्डचे बिल भरताना त्यांची परिस्थिती कठीण होते. त्यामुळे क्रेडिट कार्डपासून अनावश्यक वस्तू खरेदी करणे टाळा.

क्रेडिट कार्ड आपल्याला आवश्यकतेनुसार रोख रक्कम काढण्याची परवानगी देखील देते. मात्र, बरेच लोक अनावश्यकपणे क्रेडिट कार्डमधून रोख रक्कम काढतात आणि नंतर त्यांना ते पैसे व्याजासह भरावे लागतात, जे महाग पडते. त्यामुळे क्रेडिट कार्डमधून रोख रक्कम काढण्याची अजिबात चूक करू नका.

क्रेडिट कार्डने कोणत्याही प्रकारची खरेदी करण्यासाठी काही रिवॉर्ड पॉइंट्स देखील आहेत. म्हणूनच हे महत्वाचे आहे की तुम्ही या रिवॉर्ड पॉईंटवर लक्ष ठेवा आणि त्यांचा वेळोवेळी वापर करत रहा, अन्यथा ते कालबाह्य होतील.

असे म्हटले जाते की, क्रेडिट कार्ड धारकांनी त्यांचा सिबिल स्कोअर मजबूत ठेवला पाहिजे. मात्र, बरेच लोक असे करण्यासाठी क्रेडिट कार्डवर जास्त खर्च करण्यास सुरुवात करतात, नंतर त्यांच्यासाठी ती एक समस्या बनते. म्हणून तुमच्या मर्यादा लक्षात ठेवा आणि तुमचा सिबिल स्कोअर मजबूत करण्यामागे पडू नका.