४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 11:44 IST
1 / 9भारतात क्रेडिट कार्डचा प्रवास १९८० मध्ये सुरू झाला. त्यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने पहिले क्रेडिट कार्ड जारी करून या पेमेंट सिस्टीमची सुरुवात केली.2 / 9सेंट्रल बँकेने जारी केलेल्या पहिल्या कार्डचे नाव 'सेंट्रल कार्ड' असे होते. हे कार्ड व्हिसा (VISA) नेटवर्कच्या अंतर्गत बाजारात आले होते.3 / 9भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, आज भारतात ११ कोटींहून अधिक सक्रिय क्रेडिट कार्ड्स वापरात आहेत.4 / 9१९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतर अनेक जागतिक बँकांनी भारतात प्रवेश केला. यामुळे कार्डमध्ये रिवॉर्ड पॉईंट्स, विमा आणि फ्रॉड झिरो लायबिलिटी यांसारख्या सुविधा आल्या.5 / 9२००० ते २०१० या दशकात इंटरनेट क्रांतीमुळे ऑनलाइन शॉपिंग वाढली. IRCTC, Flipkart आणि MakeMyTrip सारख्या कंपन्यांमुळे कार्ड पेमेंट रोजचा व्यवहार बनले.6 / 9२०१० नंतर NPCI ने RuPay (२०१२) कार्ड्स बाजारात आणले. यामुळे टियर-२ व टियर-३ शहरांमध्ये आणि छोट्या बँकांमध्ये कार्ड्सची पोहोच वाढली.7 / 9सध्या बाजारात ग्राहकांच्या गरजेनुसार रेग्युलर, ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, फ्यूएल कार्ड आणि UPI लिंक केलेले डिजिटल कार्ड्स असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.8 / 9पूर्वी क्रेडिट कार्ड केवळ मोठ्या बँका आणि उच्च क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी होते. आता AU किंवा Suryoday सारख्या लघु वित्त बँका देखील कार्ड जारी करत आहेत.9 / 9क्रेडिट कार्ड आता केवळ मोठ्या शहरांतील लोकांचे उत्पादन राहिलेले नाही. ते आता प्रत्येक सेगमेंटमध्ये उपलब्ध असून ग्राहकांचे प्रोफाइल पूर्वीपेक्षा खूपच विस्तृत झाले आहे.