जगातील कोणत्या देशात मिळते सर्वाधिक स्वस्त पेट्रोल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 11:19 AM2023-04-25T11:19:01+5:302023-04-25T11:54:12+5:30

Petrol Prices : जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएलामध्ये 2 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळते.

जगातील अनेक देशांमध्ये गेल्या काही वर्षांत पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे संपूर्ण जगात महागाईही वाढली आहे. भारतात पेट्रोलची किंमत 110 रुपये प्रति लिटर आहे. त्याचवेळी शेजारील देश पाकिस्तानमध्ये ही किंमत 290 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

पण, जगात असे काही देश आहेत जिथे पेट्रोल पाण्याच्या किमतीत मिळते. आम्ही तुम्हाला त्या देशांबद्दल सांगत आहोत, जिथे पेट्रोल जगातील सर्वात स्वस्त आहे. या लिस्टमध्ये पहिले नाव व्हेनेझुएलाचे आहे. कच्च्या तेलाचा मोठा साठा असलेला हा अमेरिकेचा शेजारी देश आहे.

जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएलामध्ये 2 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळते. व्हेनेझुएलाप्रमाणेच उत्तर आफ्रिकन देश लिबियामध्येही पेट्रोलची किंमत खूपच कमी आहे. येथे पेट्रोल 2.50 रुपये प्रति लिटर दराने विकले जाते.

व्हेनेझुएलाप्रमाणेच इराणमध्येही तेलाचा प्रचंड साठा आहे, त्यामुळे इथे पेट्रोल 4-5 रुपये प्रति लिटरने विकले जाते. आखाती देश कुवेतमध्ये पेट्रोलची किंमत सुमारे 27 रुपये प्रति लीटर आहे.

अंगोला आणि अल्जेरियामध्ये पेट्रोलची किंमत भारताच्या तुलनेत सुमारे 4 पट कमी आहे. कारण इथे पेट्रोलचे दर अनुक्रमे 25 रुपये आणि 27 रुपये प्रति लिटरच्या आसपास आहेत.

जगातील काही देशांमध्ये पेट्रोल हे पाण्याच्या किंमत मिळते, तर अनेक देशांमध्ये 200 रुपये प्रति लिटर किंवा त्याहून अधिक आहे. मोनॅकोमध्ये पेट्रोलची किंमत 185.9 रुपये प्रति लिटर, नॉर्वेमध्ये 183.25 रुपये आणि आइसलँडमध्ये 192.30 रुपये प्रति लीटर आहे.

हाँगकाँगमध्ये पेट्रोलची किंमत 242.92 रुपये प्रति लिटर आणि पाकिस्तानमध्ये 282 रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान, पेट्रोलच्या किमती सतत वाढत असतात आणि कमी होत असतात, त्यामुळे किंमतीत फरक असू शकतो.