दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 15:28 IST2025-10-13T14:57:26+5:302025-10-13T15:28:11+5:30
दिवाळीचा सण जवळ आला आहे. दिवाळीमुळे वेगवेगळ्या कंपन्यांकडून अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट्स दिले जातात. यात अनेक कार उत्पादक कंपन्यांचाही समावेश आहे.

दिवाळीचा सण जवळ आला आहे. दिवाळीमुळे वेगवेगळ्या कंपन्यांकडून अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट्स दिले जातात. यात अनेक कार उत्पादक कंपन्यांचाही समावेश आहे. या दिवाळीला अनेक कार उत्पादक कंपन्यांनी ऑफर्स आणि डिस्काउंट्स आणले आहेत. आज आम्ही तुम्हाला कार उत्पादक कंपनी किआच्या (Kia) गाड्यांवर सुरू असलेल्या डिस्काउंट्स आणि ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊया किआच्या कोणत्या कारवर कोणते डिस्काउंट ऑफर सुरू आहेत.
किआ सोनेट
किआ सोनेटवर सध्या ४५,००० रुपयांपर्यंतचा डिस्काउंट सुरू आहे. यात १०,००० रुपयांची कॅश ऑफर, २०,००० रुपयांचा एक्सचेंज ऑफर आणि १५,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. किआ सोनेटच्या किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, किआ सोनेटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ७.३० लाख रुपये आहे.
किआ सेल्टोस
किआ सेल्टोसवर सध्या ७५,००० रुपयांपर्यंतचा डिस्काउंट सुरू आहे. यात ३०,००० रुपयांचा कॅश ऑफर, ३०,००० रुपयांचा एक्सचेंज ऑफर आणि १५,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. किआ सेल्टोसच्या किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, किआ सेल्टोसची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १०.७९ लाख रुपये आहे.
किआ सिरोस
किआ सिरोसवर सध्या ८०,००० रुपयांपर्यंतचा डिस्काउंट सुरू आहे. यात ३५,००० रुपयांचा कॅश ऑफर, ३०,००० रुपयांचा एक्सचेंज ऑफर आणि १५,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. किआ सिरोसच्या किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, किआ सिरोसची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ८.६७ लाख रुपये आहे.
किआ कॅरेंस क्लेविस
किआ कॅरेंस क्लेविसवर सध्या ६५,००० रुपयांपर्यंतचा डिस्काउंट सुरू आहे. यात २०,००० रुपयांचा लॉयल्टी बेनिफिट, ३०,००० रुपयांचा एक्सचेंज ऑफर आणि १५,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. किआ कॅरेंस क्लेविसच्या किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, किआ कॅरेंस क्लेविसची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ११.०७ लाख रुपये आहे.
किआ कार्निवल
किआ कार्निवलवर सध्या १.१५ लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट सुरू आहे. यात १ लाख रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफर आणि १५,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. किआ कार्निवलच्या किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, किआ कार्निवलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ५९.४२ लाख रुपये आहे.