BSNL चे जबरदस्त प्लान! Jio पेक्षा दररोज दुपटीपेक्षा जास्त डेटा व अधिक सुविधा; एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 12:21 PM2021-07-21T12:21:55+5:302021-07-21T12:27:03+5:30

BSNL ने असे प्लान आणले आहेत, ज्यामुळे थेट Jio ला मोठी टक्कर मिळेल, असे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स...

टेलिकॉम क्षेत्रात जिओची एन्ट्री झाल्यापासून स्पर्धा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक कंपनी आपला ग्राहक टिकावा, यासाठी प्रयत्न करत असते.

कमी पैशांमध्ये अधिकाधिक सुविधा देण्याचा सर्वच कंपन्यांचा प्रयत्न असतो. सरकारी कंपनी असलेली BSNL आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करताना दिसत असली, तरी अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्लान्समुळे ती कायम चर्चेत असते.

BSNL ने असा प्लान आणला आहे, ज्यामुळे थेट Jio ला टक्कर मिळेल, असे सांगितले जात आहे. बीएसएनएलने ५९९ रुपयांचा नवीन प्रीपेड प्लान आणला आहे.

BSNL च्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.

याशिवाय यात अनलिमिटेड नाइट डेटाची देखील सुविधा मिळेल. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. अन्य फायद्यांमध्ये यात बीएसएनएल ट्यून आणि झिंग म्यूझिक अ‍ॅपचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Jio च्या ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज केवळ २ जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.

या प्लानची वैधता ८४ दिवस असून यात जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. दुसरीकडे BSNL चा ४४७ रुपयांचा आणखी एक प्लान आहे.

BSNL ने नो डेली डेटा लिमिटसह नवीन प्लान देखील सादर केला होता. यात १०० जीबी डेटा मिळतो. ६० दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची देखील सुविधा मिळते.

या प्लानमध्ये दररोज कितीही डेटा वापरू शकता. तसेच, BSNL Tunes आणि Eros Now चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. Jio च्या ४४७ रुपयांच्या फ्रीडम प्रीपेड प्लानमध्ये ५० जीबी डेटा मिळतो. हा डेटा वापरण्यास कोणतीही डेली लिमिट नाही.

डेटा संपल्यानंतर 64Kbps स्पीड मिळतो. या प्लानची वैधता ६० दिवस असून, यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.