BSNL कडून युझर्सना Diwali Gift; रिचार्ज करा आणि ३० दिवसांपर्यंत चालणार प्लॅन्स, पाहा ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 09:53 AM2021-10-13T09:53:13+5:302021-10-13T09:59:21+5:30

BSNL Festive Offers : सरकारी दूरसंचार कंपनी BSNL नं आपल्या ग्राहकांसाठी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर काही ऑफर्स आणल्या आहेत.

BSNL Festive Offers Recharge Plans : सरकारी दूरसंचार कंपनी BSNL नं आपल्या ग्राहकांसाठी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर काही ऑफर्स आणल्या आहेत. बीएसएनएलनं आपल्या तीन प्रीपेड प्लॅन्सची वैधता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत ग्राहकांना १ महिन्यापर्यंत मोफत डेटा आणि कॉलिंग सेवेचा फायदा देण्यात येईल.

जर तुम्हाला अधिक दिवस चालणारा प्रीपेड प्लॅन हवा असेल तर तुम्हाला किमान २४७ रूपये खर्च करावे लागतील. परंतु ३० दिवसांपर्यंत अधिक वैधता असलेली ऑफर ठराविक तारखेपर्यंत रिचार्ज केल्यानंतरच मिळणार आहे.

BSNL प्रीपेड मोबाइल ग्राहक BSNL च्या विशेष दसरा आणि दिवाळी ऑफर २०२१ चा लाभ ७ ऑक्टोबर २०२१ ते ६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत घेऊ शकतात. या ऑफर अंतर्गत कंपनी ग्राहकांना त्यांच्या प्लॅन्सवर अधिक वैधता देत आहे.

बीएसएनएलची ही अधिक वैधता असलेली ऑफर २४७ रूपये, ३९८ रूपये, १९९९ रूपयांच्या रिचार्जवर उपलब्ध आहे. बीएसएनएलच्या २४७ रूपयांच्या आणि ३९८ रूपयांच्या प्लॅनवर ५ दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल. तर १९९९ रूपयांच्या प्लॅनवर ३० दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल.

२४७ रूपयांच्या प्लॅनसह ५ दिवसांची अधिक वैधता देण्यात येत आहे. यापूर्वी या प्लॅनची वैधता ३० दिवसांची होती. परंतु ऑफर अंतर्गत आता ३५ दिवसांची वैधता देण्यात येत आहे.

यामध्ये एकूण ५०GB डेटा देण्यात येत आहे आणि दररोज १०० SMS दिले जातात. तसेच अमर्यादित कॉलिंग सुविधाही उपलब्ध आहे. यासह, Eros Now आणि BSNL Tune चं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.

बीएसएनएलच्या ३९८ रूपयांच्या प्लॅनसहदेखील ५ दिवसांची अतिरिक्त वैधता देण्यात येत आहे. या प्लॅन अंतर्गत मिळणाऱ्या सुविधांचा लाभ ३० दिवस मिळत होता. परंतु आता ऑफर अंतर्गत ३५ दिवसांची वैधता मिळणार आहे.

यामध्ये कोणत्याही FUP शिवाय अनलिमिटेड डेटाचा वापर करता येतो. यामध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि दररोज १०० SMS ची सुविधाही देण्यात येणार आहे.

१९९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ GB डेटासह अनिलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि दररोज १०० SMS देण्यात येतात. या प्लॅनची वैधता ३६५ दिवस इतकी आहे. दरम्यान, ऑफर अंतर्गत आता या प्लॅनची वैधता ३० दिवस वाढवण्यात आली आहे. याचाच अर्थ हा प्लॅन आता ३९५ दिवस चालणार आहे.