सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 14:07 IST2025-12-12T14:03:31+5:302025-12-12T14:07:23+5:30

Gold Silver Price Today on Dec 11: आज चांदी ४५०० रुपयांनी वधारून १,९२,७८१ रुपये प्रति किलोवर खुली झाली आणि जीएसटीसह १,९८,५६४ रुपये प्रति किलोवर पोहोचली.

देशातील सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात जबरदस्त तेजी दिसून आली आहे. या तेजीमुळे चांदीना भाव नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. तर सोन्याच्या दरातही जबरदस्त तेजी दिसून आली आहे.

आज चांदी ४५०० रुपयांनी वधारून १,९२,७८१ रुपये प्रति किलोवर खुली झाली आणि जीएसटीसह १,९८,५६४ रुपये प्रति किलोवर पोहोचली.

महत्वाचे म्हणजे, चांदीमध्ये केवळ एका वर्षातच १,०६,७६४ रुपये प्रति किलोची जबरदस्त तेजी दिसून आली आहे. गुरुवारी जीएसटी वगळता चांदीचा भाव १,८८,२८१ रुपये प्रति किलो होता तर सोन्याचा भाव १,२८,५९६ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता.

आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १९७३ रुपयांनी वधारून १,३०,५६९ रुपये प्रति १० ग्रॅमवर खुला झाला. जीएसटीसह याची किंमत आता १,३४,४८६ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. विशेष म्हणजे, या वर्षात सोन्याच्या दरात आतापर्यंत ५४,८२९ रुपयांची वाढ झाली आहे.

२२ कॅरेट सोने जीएसटीसह १,२३,१८९ रुपये आणि १८ कॅरेट सोने १,००,८६४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. सोन्याचा आजचा दर १७ ऑक्टोबरच्या १,३०,८७४ रुपये या सर्वकालीन उच्चांकापेक्षा केवळ ३०५ रुपयांनी कमी आहे.

चांदीचा भाव आज १,९२,७८१ रुपये किलो या नवीन सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. आयबीजेए (IBJA) दिवसातून दुपारी १२ आणि सायंकाळी ५ च्या सुमारास, असे दोन वेळा सोन्या-चांदीचे दर जाहीर करत असते.

याशिवाय, २३ कॅरेट सोने १९६५ रुपयांनी वधारून १,३०,०४६ रुपयांवर आणि जीएसटीसह १,३३,९४७ रुपये प्रति १० ग्रॅमवर खुले झाले. तर १४ कॅरेट सोने ११५४ रुपयांनी घसरून ७६,३८३ रुपये तर जीएसटीसह ७८,६७४ रुपये प्रति १० ग्रॅमवर खुले झाले.