आमचा रोजगार धोक्यात, मार्ग काढा; Big Bazaar च्या महिला कर्मचाऱ्यांचे PM मोदींना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 09:09 PM2021-03-08T21:09:54+5:302021-03-08T21:14:41+5:30

जगातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन (Amazon) आणि फ्यूचर ग्रुप (Future Group) यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाई सुरू आहे. फ्यूचर रिटेल आणि रिलायन्स यांच्यात एक करार झाला आहे, ज्या अंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) फ्यूचर रिटेल स्टोअर चालवणार आहे. हा करार अंतिम झाला नाही, तर आमचा रोजगार धोक्यात येईल, असे पत्र Big Bazaar च्या महिला कर्मचाऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लिहिले आहे. big bazaar women employees letter to pm narendra modi

नवी दिल्ली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने Big Bazaar मध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून आपल्या व्यथा मांडल्या आहेत. आमचा उदरनिर्वाह, रोजगार धोक्यात असून, यात हस्तक्षेप करण्याची विनंती महिला कर्मचाऱ्यांच्या एका गटाने थेट मोदींना केली आहे.

जगातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन (Amazon) आणि फ्यूचर ग्रुप (Future Group) यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाई सुरू आहे. फ्यूचर रिटेल आणि रिलायन्स यांच्यात एक करार झाला आहे, ज्या अंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) फ्यूचर रिटेल स्टोअर चालवणार आहे. मात्र, रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपच्या करारावर अॅमेझॉनने आक्षेप नोंदवत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

बिग बाजारमध्ये काम करणार्‍या महिला कर्मचाऱ्यांच्या एका गटाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधलाय. कोरोना व्हायरस सर्व देशभर पसरलेला असताना आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय. रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपच्या करार थांबवण्याच्या अॅमेझॉनच्या प्रयत्नांमुळे आमचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे, असे या महिलांनी पत्रात म्हटले आहे.

फ्यूचर रिटेल आणि रिलायन्स यांच्यात एक करार झाला आहे, ज्या अंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीज फ्यूचर रिटेल स्टोअर चालवणार आहे. रिलायन्सने फ्यूचर रिटेलच्या पुरवठादार आणि विक्रेत्यांना सर्व थकबाकी देण्याचे आश्वासनही दिले आहे. मात्र, हा करार अंतिम झाला नाही, तर आमचा रोजगार धोक्यात येईल, असे यात म्हटल्याचे सांगितले जाते.

बिग बाजारशी संबंधित असलेल्या या गटाचा दावा आहे की, यात दोन लाखांहून अधिक महिला कंपनीशी संबंधित आहेत. सुमारे १० हजार महिलांचा फ्यूचर ग्रुपशी थेट संबंध आहे. अन्य दोन लाख महिला आपापल्या गटाद्वारे अप्रत्यक्षरित्या पैसे कमवतात.

महिलांचे गट फ्यूचर समूहाच्या Big Bazaar ब्रँडसाठी उत्पादने पुरवतात. समूहाचे इतर ब्रँड एफबीबी, सेंट्रल ब्रँड फॅक्टरी, ईजीडे, हेरिटेज सिटी, डब्ल्यूएच स्मिथ आणि 7-इलेव्हन यांना अनेक उत्पादनांचा पुरवठा करतात.

नोकरी गमावल्यानंतर या महिलांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसेल. परिणामी, त्यांना अडचणीतून जावे लागू शकते, असे या गटाने आपल्या पत्रात म्हटले आहे. बिग बझार ही कंपनी फ्यूचर रिटेल अंतर्गत कार्यरत आहे. फ्युचर ग्रुपचे संस्थापक किशोर बियानी यांनी २४ हजार ७१३ कोटी रुपयांचा रिलायन्सशी करार केला आहे.

जर फ्यूचर ग्रुप-रिलायन्स दरम्यान झालेल्या करारामुळे अॅमेझॉनला हस्तक्षेप करण्याची परवानगी मिळाली, तर त्याचा परिणाम या लहान शहरांमध्ये रोजीरोटी टिकवणाऱ्या महिला गटांवर होईल, असे Big Bazaar च्या महिला कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

शातील सुमारे सहा हजार छोटे व्यापारी आणि पुरवठादार असलेल्या या फ्युचर ग्रुपवर सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. दरम्यान, फ्यूचर ग्रुप आणि अ‍ॅमेझॉन सध्या कायदेशीर लढाई लढत आहेत. फ्यूचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल व्यवसाय रिलायन्स रिटेलला विकण्याचा करार झाला आहे.

या करारावर अ‍ॅमेझॉनने आक्षेप नोंदविला आहे. दोन्ही बाजूंनी हे प्रकरण अनेक कायदेशीर बाबीत अडकले आहे. त्यामुळे आता लाखों जणांचा रोजगार धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महिला दिनाच्या दिवशी ig Bazaar च्या महिला कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.