FD मध्ये जराशी चूक आणि होऊ शकतं नुकसान; बॅंकाही सांगत नाहीत, या गोष्टींकडे ठेवा लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 09:41 AM2023-08-18T09:41:25+5:302023-08-18T09:55:18+5:30

काही गोष्टी अशा आहेत ज्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करुन चालणार नाही आणि तुम्हाला अनेकदा बँकाही याबद्दल सांगत नाहीत.

सध्या गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तर फिक्स्ड डिपॉझिट्सना आजही ग्राहकांकडून पसंती मिळतेय. यामध्ये मॅच्युरिटीनंतर तुम्हाला निश्चित परतावा मिळतो. यामध्ये तुम्हाला चांगलं व्याजही मिळतं.

पण काही गुंतवणूक सल्लागार मानतात की त्यालाही काही मर्यादा आहेत. यामध्ये जर ती बँक डिफॉल्ट झाली तर तुमचे पैसे बुडण्याचा धोका असतो.

तर दुसरीकडे मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढल्यास दंड भरावा लागतो. त्यामुळे गुंतवणूकदारानं त्याबद्दल समजून घेणे आणि जाणून घेणं आवश्यक आहे. एफडीमधील होणाऱ्या या नुकसानीबद्दल जाणून घेऊ.

जर तुम्हाला गरजेच्या वेळी पैसे काढायचे असतील तर तुम्हाला एफडी मोडता येणार नाही. पण तुम्ही ती मोडली तर बँक तुम्हाला व्याज देणार नाही आणि दंडही भरावा लागेल. एफडी करताना दंडाची रक्कम अटींमध्ये लिहिली जाऊ शकते. प्रत्येक बँकेसाठी ते वेगळे असू शकते.

अनेकदा बँक बुडण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदाराच्या ठेवीवरील जोखीम वाढते. नवीन नियमानुसार, बँक बुडल्यास एकूण ठेवीवर ५ लाख रुपयांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही बँकेत १५ लाख रुपयांची एफडी केली असेल आणि ती बँक बुडली तर तुम्हाला फक्त ५ लाख रुपयांपर्यंतच मिळणार आहे. उर्वरित १० लाख रुपये बुडण्याचा धोका आहे.

यामध्ये बाजारात झालेल्या नफ्याचा कोणताही फायदा होणार नाही. कारण यामध्ये व्याजदर स्थिर राहतो. जर महागाईचा दर ६ टक्के झाला आणि तुम्हाला मिळणारं व्याज फक्त ५ ते ६ टक्के असेल, तर या परिस्थितीत तुम्हाला फक्त निगेटिव्ह रिटर्न मिळेल.

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याचा पहिला तोटा म्हणजे व्याजदर निश्चित असतो. म्हणजेच बँकेनं तुम्हाला दिलेलं व्याज स्थिर राहते. स्टॉक किंवा म्युच्युअल फंड यांसारख्या इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये तुम्हाला मिळणारे व्याज एफडीपेक्षा खूप जास्त आहे.