शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

1 फेब्रुवारीपासून बँकिंगशी संबंधित अनेक नियम बदलणार, जाणून घ्या तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 2:53 PM

1 / 6
पुढील फेब्रुवारी महिना खूप बदल घेऊन येईल. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करतील. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत बदल होतील. तसेच, सर्वसामान्यांच्या जीवनावरही याचा परिणाम होणार आहे. अर्थसंकल्प व्यतिरिक्त महत्त्वाचे म्हणजे 1 फेब्रुवारीपासून काही बँकाही त्यांचे नियम बदलणार आहेत.
2 / 6
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) दिलेल्या माहितीनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांदरम्यान रक्कम ट्रान्सफर केल्यास 20 रुपये + जीएसटी शुल्क आकारले जाणार आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बॅंकेने IMPS च्या माध्यमातून ट्रान्झॅक्शनची रक्कम 2 लाखांवरून वाढवत 5 लाख रुपये केली होती. रिझर्व्ह बॅंकेने IMPS च्या माध्यमातून होणाऱ्या ट्रान्झॅक्शनची मर्यादा वाढवली होती. त्यामुळे ग्राहक आता एका दिवसात 2 लाखांऐवजी 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकतात.
3 / 6
1 फेब्रुवारीपासून बँक ऑफ बडोदाचे (Bank Of Baroda) चेक क्लिअरन्सशी (cheque Clearance) संबंधित नियम बदलणार आहेत. आता 1 फेब्रुवारीपासून चेक अर्थात धनादेशाव्दारे पेमेंटसाठी, ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टीमचा (Positive Pay System) वापर करावा लागणार आहे. याचा अर्थ ग्राहकांनी चेकशी संबंधित माहिती दिल्यानंतरच चेक क्लिअर होईल. नियमातील हा बदल 10 लाख रुपयांवरील चेक क्लिअरन्ससाठी असेल.
4 / 6
पंजाब नॅशनल बॅंक (Punjab National Bank) जे नियम बदलणार आहे, त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. तुमच्या खात्यात पैसे नसल्याने हप्ता किंवा गुंतवणुकीची प्रक्रिया फेल झाली तर तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागणार आहे. आतापर्यंत दंडाची रक्कम 100 रुपये होती. मात्र आता ती वाढवून 250 रुपये करण्यात आली आहे.
5 / 6
एलपीजीचे दर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केले जातात. यावेळी म्हणजेच 1 फेब्रुवारीला एलपीजी घरगुती गॅसचे दर वाढतात की स्थिर राहतात, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
6 / 6
1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर (personal income tax rates) नियमांमध्ये बदल होऊ शकतात. अर्थसंकल्प तुमच्या आर्थिक जीवनात आणखी बरेच बदल घडवून आणू शकतो.
टॅग्स :businessव्यवसायbankबँकSBIएसबीआयPunjab National Bankपंजाब नॅशनल बँकBudgetअर्थसंकल्प