जबरदस्त...! एक डील अन् हा शेअर बनलाय रॉकेट...; रेखा झुनझुनवालांकडे जवळपास 38 लाख शेअर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 20:09 IST2024-12-13T20:05:14+5:302024-12-13T20:09:22+5:30
पब्लिक शेअरहोल्डर्समध्ये, दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 5.19 टक्के हिस्सा अथवा 37,99,000 शेअर्स आहेत...

शेअर बाजारातील प्रचंड चढउतारांदरम्यान क्रिसिलच्या शेअरने शुक्रवारी सर्वकालीन उच्चांक गाठला. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, हा शेअर 6 टक्क्यांच्या तेजीसह BSE वर 5899.60 रुपयांवर पोहोचला. हा या शेअरचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यानंतर, हा शेअर 5.41% ने वाढून 5824.50 रुपयांवर बंद झाला.
असं आहे तेजीचं कारण - क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलने गुरुवारी डिजिटल क्रेडिट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतील 4 टक्के हिस्सेदारी विकत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर संबंधित शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे.
कंपनीने म्हटले आहे की, CRISIL च्या संचालक मंडळाने ऑनलाइन PSB लोन (OPL) लिमिटेड मध्ये 4.08 टक्के हिस्सेदारीसाठी 33.25 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.
शेअरहोल्डिंग पॅटर्न - CRISIL च्या शेअरहोल्डिंग पॅटर्नसंदर्भात बोलायचे झाल्यास, प्रमोटर्सकडे कंपनीचे 66.64 टक्के हिस्सेदारी आहे. तर, पब्लिक शेअरहोल्डर्सकडे 33.36 टक्के हिस्सेदारी आहे.
पब्लिक शेअरहोल्डर्समध्ये, दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 5.19 टक्के हिस्सा अथवा 37,99,000 शेअर्स आहेत. म्युच्युअल फंडांत, कोटक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड, एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंड आणि क्वांट म्युच्युअल फंड - क्वांट मिड कॅप फंड यांचाही मोठा हिस्सा आहे.
असे आहेत तिमाही परिणाम - FY2023-24 मध्ये ओपीएलचा एकूण महसूल 44.87 कोटी रुपये होता. क्रिसिलने आपल्या प्रॉफिटमध्ये वार्षिक आधारावर 12.86 टक्क्यांची वृद्दी नोंदवली. जी सप्टेंबर 2024 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत 171.55 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. तिमाहीमध्ये वार्षिक आधारावर एकूण उत्पन्न 7.9 टक्क्यांनी वाढून 833.2 कोटी रुपयांवर पोहोचले. जे गेल्या वर्षाच्या समान कालावधीत 771.8 कोटी रुपये होते.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)