...अन्यथा तुमच्या खिशाला कात्री बसेल; १ ऑगस्ट म्हणजे आजपासून काय नवे बदल, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 09:37 AM2021-08-01T09:37:30+5:302021-08-01T09:44:15+5:30

१ ऑगस्टपासून देशात अनेक नियमांमध्ये बदल होणार असून त्याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.

पेट्रोल-डिझेलच्या सतत दरवाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच आजपासून सुरू होत असलेल्या नव्या महिन्यात आणखी काही नव्या नियमांची भर पडणार आहे.

एटीएममधून पैसे काढणे महाग होणार असून सिलेंडरच्या दरातही वाढ होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. एरवी बँकांना शनिवार-रविवार सुट्टी असते आणि सणावारांच्या दिवशीही बँकांचे व्यवहार बंद असतात त्यामुळे वेतन वा पेन्शन मिळू शकत नाही.

१ ऑगस्टपासून इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या डोअर स्टेप बँकिंग सुविधेसाठी शुल्क आकारणी केली जाऊ शकते. आयपीपीबीने जारी केलेल्या परिपत्रकानुसार डोअर स्टेप बँकिंग सुविधेसाठी २० रुपये अधिक जीएसटी असे शुल्क द्यावे लागणार आहे.

आतापर्यंत ही सुविधा नि:शुल्क होती. आयपीपीबीच्या खात्यातून किंवा इतर कोणत्या बँकेच्या ग्राहकाच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर त्यासाठी शुल्क आकारणी केली जाणार आहे.

स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीचा आढावा दर महिन्याच्या पहिल्या आणि १५ व्या तारखेला घेतला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीनुसार त्यात चढ उतार होतात. ऑगस्टमध्येही सिलेंडरच्या किंमतीत बदल होणे शक्य आहे. गेल्या महिन्यात सरकारने २५ रुपयांची वाढ केली होती.

१ ऑगस्टपासून एटीएमच्या इंटरचेंज शुल्कातही बदल होत आहेत. सध्या १५ रुपये असलेले हे शुल्क १७ रुपये होणार आहे. नॉन फायनान्शिअल व्यवहारावर हे शुल्क ६ रुपये इतके असतील. ATM च्या देखभालीसाठी येणाऱ्या खर्चाची वसुली करण्यासाठी ग्राहकांकडून वाढीव शुल्क आकारले जाणार आहे.

ATM वर तीन व्यवहार नि:शुल्क असतील. त्यावरील व्यवहारांसाठी शुल्क आकारणी केली जाईल. ICICI बँकेतून पैसे काढणे आणि बँकेत पैसे जमा करणे किंवा चेकबुक घेणे इत्यादी व्यवहारात बदल या महिन्यापासून अंमलात येणार आहे.

मात्र १ ऑगस्टपासून बँक हॉलिडेलाही वेतन वा पेन्शन मिळू शकणार आहे. कारण रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस सिस्टीम आठवड्याचे सातही दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबर बँकेच्या सुट्टीच्या दिवशीही तुमच्या बँक खात्यातून कर्जाचा EMI वळता होऊ शकणार आहे.

तुम्ही ICICI बँकेचे ग्राहक असाल तर शाखेतून केवळ ४ वेळाच चेकद्वारे पैसे काढणे वा भरण्याचे व्यवहार करता येतील. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर १५० रुपये शुल्क आकारणी केली जाईल.

बँकेनं याबाबत आपल्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. तसंच सहा मेट्रो शहरांमध्ये ग्राहकांना एका महिन्याच्या आत केवळ ३ मोफत ट्रान्झॅक्शन्स करता येणार आहेत. त्यानंतर सातव्या ट्रान्झॅक्शनपासून शुल्क लावण्यास सुरूवात होणार आहे.

टॅग्स :बँकbank