1 / 15आपलं स्वत:चं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. घर खरेदीसाठई होम लोन घेण्याचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा असतो. कारण होम लोन हे दीर्घ काळ फेडावं लागतं.2 / 15दीर्घ कालावधी असल्यानं यासाठी खुप विचार करून निर्णय घ्यावे लागतात. पाहूया पहिल्यांदा होम लोन घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. जेणेकरून EMI फेडताना कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही.3 / 15बँकेसह अनेक वित्तीय संस्थांसाठी ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुमचा उत्तम क्रेडिट स्कोअर तुम्हाला अधिक आणि स्वस्त लोन मिळवून देण्यास मदतीचा ठरतो.4 / 15८०० बेसिस पॉईंट्सवरील क्रेडिट स्कोअर हा सर्वोत्तम मानला जातो. तसंच तुम्हा सध्याच्या EMI आणि क्रेडिट कार्डाचं बिल भरून तो अधिक चांगला केला जाऊ शकतो.5 / 15तुमचा क्रेडिट स्कोअर माहित करून घेतल्यानंतर तुम्ही आयडी प्रुफ, अॅड्रेस प्रुफ, इन्कम टॅक्स रिटर्नचे डॉक्युमेंट्स, बँक स्टेटमेंट्स, एम्प्लॉयर प्रुफसह अन्य कागदपत्रे तयार ठेवा.6 / 15जर तुम्ही कोणतंही घर खरेदी करणं निश्चित केलं आहे तर सेलरचं आयडी प्रुफ आणि अॅड्रेस प्रुफ, प्रॉपर्टीचं टायटल, नकाशा आणि कम्पलिशन सर्टिफिकेट सर्व एकत्र करून घ्या. यामुळे लोन घेण्यासाठी समस्या निर्माण होणार नाहीत. 7 / 15जर तुम्ही लोन घेताना आपल्या सोबत को अॅप्लिकंट जोडत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. अशा परिस्थितीत बँक तुमच्या को अॅप्लिकंटच्याही उत्पन्नाचा कर्ज देताना विचार करते. एकत्र अर्ज केल्यानं तुमची पात्रता वाढते.8 / 15जॉईंट होम लोनमुळे दोन्ही अर्जदारांना टॅक्स डिडक्शनचा फायदा मिळतो. सोबतच महिला अर्जदार असेल तर काही बँका होम लोनच्या इंटरेस्ट रेटमध्येही फायदा देतात. जॉईंट होम लोनमुळे ईएमआयचा भारही एका व्यक्तीवरचा कमी होऊ शकतो. 9 / 15होम लोन घेण्यापूर्वी कोणती बँक किती दरावर तुम्हाला लोन देत आहे याचा विचार करा. प्रत्येक बँकांचे व्याजदर निराळे असू शकतात. तसंच यात १० ते २० बेसिस पॉईंट्सचा फरक असू शकतो. तसंच दीर्घ कालावधीच्या लोनमध्ये तुमचे पैसेही वाचू शकतात.10 / 15जर कोणताही अर्जदार नव्यानं तयार झालेलं घर घेत असेल तर प्री अप्रुव्ह्ड बँकेकडून लोन घेतल्यास ते लवकर मंजुर हगोतं. कारण बँकेकडे या प्रॉपर्टीबद्दल पहिल्यापासून माहिती उपलब्ध असते. तसंच अशा प्रॉपर्टीवर बँक अन्य बँकांच्या तुलनेत कमी दरानं लोन देऊ शकते.11 / 15तथापि, होम लोनशी संबंधित बँक दस्तऐवज वाचणे एक अवघड काम आहे कारण ते खूप अवजड आणि तांत्रिक अटींनी भरलेले आहे. तरीही, शक्य तितकं वाचून एखाद्याने ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.12 / 15यासाठी तुम्ही फायनॅन्शिअल कंटेन्ट किंवा लोनशी संबंधित माहिती देणाऱ्या साईट्सची मदत घेऊ शकता. कागदपत्रांमध्ये छोट्या अक्षरात लिहिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचण्याचा प्रयत्न करा. ईएमआय पेमेंटशी संबंधित अटी व शर्थी नीट वाचणे आणि समजणे महत्वाचे आहे.13 / 15सामान्यत: बँका कर्ज देताना २० टक्के डाऊन पेमेंटची मागणी करतात. काही बँकांमध्ये ते अनिवार्यदेखील आहे. परंतु जर घराच्या किंमतीच्या ५० ते ६० टक्क्यांपर्यंतची रक्कमची डाऊन पेमेंट म्हणून दिली तर कर्जाचा आणि ईएमआयचा बोजा कमी होऊ शकतो. 14 / 15तुम्ही जितकं डाऊन पेमेंट कराल तितका तुमच्यावरील बोजा कमी होऊ शकतो. काही बँका लोनचा कालावधी ३० वर्षांचा ठेवतात. परंतु ग्राहकांनी हा कालावधी २० वर्षांपेक्षा अधिक घेऊ नये.15 / 15लोनची परतफेड करण्यासाठी तुम्ही जितका दीर्घ कालावधी निवडाल तितकाच तुमच्यावरील आर्थिक बोजा वाढत जाईल. तसंच व्याजदरामध्येही अस्थिरतेचा धोका राहू शकतो.