अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:00 IST
1 / 10२००० च्या दशकाच्या अखेरीस अनिल अंबानी यांची संपत्ती ४२ अब्ज डॉलर्स (सुमारे ३.५ लाख कोटी रुपये) होती आणि ते जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.2 / 10त्यांना रिलायन्स टेलिकॉम, रिलायन्स कॅपिटल यांसारखे मोठे व्यवसाय वारसा हक्काने मिळाले होते, पण काही चुकीच्या निर्णयामुळे त्यांच्या कंपन्या तोट्यात गेल्या आणि त्यांना 'मी शून्य झालो आहे' असे म्हणावे लागले.3 / 10त्यांना रिलायन्स टेलिकॉम, रिलायन्स कॅपिटल यांसारखे मोठे व्यवसाय वारसा हक्काने मिळाले होते, पण काही चुकीच्या निर्णयामुळे त्यांच्या कंपन्या तोट्यात गेल्या आणि त्यांना 'मी शून्य झालो आहे' असे म्हणावे लागले.4 / 10आजही त्यांच्याकडे असलेली सर्वात मौल्यवान आणि महागडी गोष्ट म्हणजे मुंबईतील त्यांचा आलिशान खाजगी बंगला.5 / 10या बंगल्याचे नाव 'अॅबोड' (Abode) असे आहे.6 / 10अहवालानुसार, या १७ मजली बंगल्याची अंदाजे किंमत सुमारे ५,००० कोटी रुपये आहे.7 / 10हा बंगला एखाद्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही. यात १६,००० चौरस फूट क्षेत्रफळ, एक हेलिपॅड, स्विमिंग पूल, जिम आणि महागड्या गाड्यांसाठी मोठे गॅरेज आहे.8 / 10बंगल्यात एक खास लाउंज एरिया आहे जिथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहता येते.9 / 10अनिल अंबानी आपल्या पत्नी टीना अंबानी आणि दोन मुलांसह, जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबानी यांच्यासोबत या बंगल्यात राहतात.10 / 10मुकेश अंबानींचे 'अँटिलिया' प्रसिद्ध असले तरी, अनिल अंबानींचा हा 'अॅबोड' बंगला देखील देशातील सर्वात महागड्या खाजगी निवासस्थानांपैकी एक आहे आणि तो अंबानी कुटुंबाच्या भव्यतेचे प्रतीक मानला जातो.