Anand Mahindra: आनंद महिंद्रांकडून प्रग्यानंदच कौतुक, कोणती कार देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 05:35 PM2022-02-22T17:35:48+5:302022-02-22T17:58:47+5:30

सोशल मीडियावर सक्रीय असलेले आणि अलौकिक कामगिरी करणाऱ्यांना थेट कार भेट देणारे उद्योगपती आनंद महिंद्र यांनीही प्रग्यानंदचं कौतूक केलंय.

भारताचा १६ वर्षांचा बुद्धिबळपटू आणि युवा ग्रँडमास्टर आर. प्रग्यानंद याने मोठी कामगिरी करून दाखवली. भारतीय ग्रँडमास्टरने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या 'वर्ल्ड चॅम्पियन' बुद्धिबळ मास्टर मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे.

प्रग्नानंदने केवळ ३९ चालींमध्ये कार्लसनला गुडघे टेकायला भाग पाडले. एअरथिंग्ज मास्टर्स (Airthings Masters chess) या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत त्याने ही कामगिरी करून दाखवत साऱ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

सोमवारी सकाळी खेळण्यात आलेल्या सामन्यात प्रग्यानंदने कार्लसनला ३९ चालींमध्ये पराभूत करत काळ्या मोहऱ्यांसह खेळ जिंकला. कार्लसनने यापूर्वी सलग तीन सामने जिंकले होते, पण प्रग्यानंदने त्याच्या अश्वमेध रोखला.

प्रग्यानंदच्या या खेळीने सारेच अवाक् झाले आहेत, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही प्रग्यानंदचं ट्विट करुन अभिनंदन केलं आहे. सध्या प्रग्यानंदवर अभिनंदनाचा वर्षावर सुरु आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेले आणि अलौकिक कामगिरी करणाऱ्यांना थेट कार भेट देणारे उद्योगपती आनंद महिंद्र यांनीही प्रग्यानंदचं कौतूक केलंय.

या युवकाने आपल्याचा चांगला धडा शिकवला. तो म्हणजे, जेव्हा आपण आपल्या कामाचा आणि चॅलेंजेसचा आनंद घेतो, तेव्हाच आपण आपली पूर्ण क्षमता सिद्ध करू शकतो…, असे ट्विट आनंद महिंद्र यांनी केले आहे.

आनंद महिंद्रांच्या या ट्विटला अनेकांनी कमेंट करुन आता यालाही थार ही गाडी देण्याची मागणी केली आहे. तर, एकाने एसयुव्ही ही कार देण्याचं सूचवलं आहे.

आनंद महिंद्राच्या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत, त्यात हे वाक्य प्रेरणादायी असल्याचं म्हटलं. तर, एकाने कमेंट करुन आता, प्रग्यानंदला कोणती कार देणार?, असा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान, या विजयानंतर भारतीय ग्रँडमास्टर प्रग्यानंदचे ८ गुण झाले आणि तो आठव्या फेरीनंतर संयुक्त १२व्या स्थानावर पोहोचला. आधीच्या फेऱ्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी करणाऱ्या कार्लसनवर प्रग्यानंदचा विजय अनपेक्षित होता.