Amazon आपल्या सर्वात मोठ्या भारतीय सेलर Cloudtail बरोबर संपवणार पार्टनरशिप; जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 10:08 IST
1 / 12दिग्गज ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon.com Inc आणि त्यांचा सर्वात मोठा सेलर Cloudtail नं आपली पार्टनरशीप संपवण्याचा निर्णय घेतला आहे. 2 / 12Amazon च्या प्लॅटफॉर्मवर Cloudtail ला अधिक प्राधान्य दिलं जात आहे, या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर दोन्ही कंपन्यांच्या या निर्णयामुळे पडदा पडणार आहे. 3 / 12Cloudtail ही कंपनी Prione Buisness Catamaran नावाच्या कंपनीच्या पूर्ण मालकीची कंपनी आहे. Amazon.com Inc आणि Caramaran यांनी जॉईंट व्हेन्चरच्या रूपात Prione Business Services ची स्थापना केली होती. 4 / 12Amazon.com Inc आणि Catamaran यांच्या जॉईंट व्हेंन्चरच्या परिचालनाशी निगडीत करार १९ मे २०२२ पुन्हा होणं अपेक्षित होतं. 5 / 12परंतु यादरम्यान, दोन्ही कंपन्यांनी मिळून एक निवेदन जारी केलं आहे. १९ मे २०२२ नंतर हा करार पुढे वाढवला जाणार नसल्याचा निर्णय त्यांनी एकत्र जाहीर केला आहे. 6 / 12फेब्रुवारी महिन्यात रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या एका अहवालात अॅमेझॉननं अनेक वर्षांपासून Cloudtail सह काही ठराविक विक्रेत्यांनाच प्राधान्य दिलं असल्याचं म्हटलं होतं. 7 / 12याचा वापर भारताच्या परदेशी गुंतवणूकीच्या नियमांतून वाचण्यासाठी केला गेला होता, असंही त्यांनी नमूद केलं होतं. 8 / 12दरम्यान, यानंतर अॅमेझॉननं स्पष्टीकर देत कोणत्याही विक्रेत्यांना आपण प्राधान्य देत नसल्याचं म्हटलं होतं. तसंत त्या त्या ठिकाणच्या कायद्यांचं कंपनी पालन करत असल्याचंही सांगितलं होतं. 9 / 12दरम्यान Amazon आणि Cloudtail यांनी करार पुन्हा न करण्याचा निर्णय का घेतला याची माहिती मात्र दिली नाही. 10 / 12यादरम्यान सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचनं Amazon आणि Flipkart यांच्याविरोधात सुरू असलेल्या अँटीट्रस्ट तपासामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास नकार दिला.11 / 12अशा प्रकारच्या तपासासाठी कंपन्यांनी स्वत: पुढे आलं पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठानं नमूद केलं. 12 / 12यापूर्वी सेबीनं या कंपन्यांच्या विरोधात तपासाचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात दोन्ही कंपन्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. तसंच हा तपास थांबवण्याची विनंतही न्यायालयाकडे करण्यात आली होती.