Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
By जयदीप दाभोळकर | Updated: April 29, 2025 09:19 IST2025-04-29T09:12:05+5:302025-04-29T09:19:58+5:30
Gold Rate on Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. या सणाला सोनं खरेदी केलं जातं. या दिवशी सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. परंतु ज्या प्रकारे सोन्याचे भाव झपाट्यानं वाढत आहेत, त्यामुळे येत्या काळात सोनं खरेदी करणं परवडेल की नाही ही शंका आहे.

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. या सणाला सोनं खरेदी केलं जातं. या दिवशी सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. परंतु ज्या प्रकारे सोन्याचे भाव झपाट्यानं वाढत आहेत, त्यामुळे येत्या काळात सोनं खरेदी करणं परवडेल की नाही ही शंका आहे. सोन्याची किंमत गगनाला भिडलेली असताना इतकं महागडे सोनं कसं खरेदी करावे? हा मोठा प्रश्न आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला एक पद्धत सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करून घरी आणू शकता.
स्वस्त सोनं खरेदी करण्यासाठी फिजिकल गोल्डऐवजी डिजिटल गोल्ड खरेदी करावं लागेल. डिजिटल गोल्ड ऑनलाइन (Digital Gold Online) डिजिटल सोनं खरेदी करण्याचा एक मार्ग आहे. यात सोनं भौतिकरित्या नव्हे तर आपल्या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवलं जातं.
डिजिटल गोल्डमध्ये तुम्हाला शुद्धतेबाबत शंका नसते. यामध्ये २४ कॅरेट शुद्धतेची शुद्धता, झिरो रिस्क आणि १०० टक्के लिक्विडिटी आहे.
डिजिटल सोनेला भौतिक सोन्यामध्ये रुपांतर करण्याचा एक पर्याय देखील असतो. याशिवाय, डिजिटल सोन्यात कोणताही लॉक-इन कालावधी नसतो. डिजिटल सोनं २४/७ ऑनलाइन खरेदी/विक्री करता येतं.
डिजिटल सोनं तुम्ही तुमच्या खिशानुसार खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला ४० ते ५० हजार रुपयांची आवश्यकता नाही. तुम्ही इच्छित असल्यास, हे फक्त १ रुपयातही खरेदी करू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपये खर्च करून सोनं खरेदी करू शकता.
फिजिकल गोल्ड खरेदी करताना मेकिंग चार्ज वगैरे द्यावे लागतात, पण डिजिटल गोल्डमध्ये मेकिंग चार्ज वगैरे लागत नाहीत. अशा परिस्थितीत याची खरेदी स्वस्त पडते.
याचा वापर गहाण ठेवण्यासाठी म्हणूनही केला जाऊ शकतो. जर हे सोनं गहाण ठेवलं तर कर्ज अतिशय सोप्या पद्धतीनं मिळवता येतं. कागदपत्रांची अडचण नसते.
डिजिटल सोन्याची खरेदी तुम्ही Google Pay, Paytm आणि PhonePe सारख्या अॅप्सच्या मदतीनं करू शकता. आजच्या काळात हे अॅप सर्वांच्या फोनमध्ये उपलब्ध असतात. त्याचबरोबर MMTC-PAMP India Pvt. Ltd, Augmont Gold Ltd आणि Digital Gold India Pvt Ltd या ३ कंपन्या भारतात आपल्या सेफगोल्ड ब्रँडसह डिजिटल सोनं ऑफर करतात. एयरटेल पेमेंट्स बँक देखील सेफगोल्डसोबत भागीदारीत डिजीगोल्ड (DigiGold) ऑफर करते.