13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:29 IST2025-10-29T15:55:59+5:302025-10-29T17:29:49+5:30

कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात १,३०९ रुपयांची वाढ झाली आहे...

गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेली सोन्याच्या दरातील घसरण आज (बुधवार) थांबली. सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली असून, चांदीच्या दरातही जवळपास ४००० रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. आज सोन्याच्या किमतीत तब्बल १,३०९ रुपये प्रति १० ग्रॅम एवढी वाढ झाली.

सोन्याचा दर बुधवारी ११९३५२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. मंगळवारी संध्याकाळी हा दर ११८०४३ रुपयांवर होता. Ibjarates च्या आकडेवारीनुसार, कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात १,३०९ रुपयांची वाढ झाली आहे.

याच बरोबर, २३ कॅरेट सोन्याचा दर आज ११८८७४ रुपये, २२ कॅरेट सोने १०९३२६ रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा दर ८९५१४ रुपये प्रति १० ग्रॅमवर गेला आहे. १४ कॅरेट सोन्याचा विचार करता, आज ते ६९८२१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे.

चांदीही वधारली - सोन्याबरोबरच चांदीही मोठ्या प्रमाणावर वधारली आहे. चांदीचा दर आज १४५७२८ रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचला आहे. मंगळवारी हा दर १४१८९६ रुपये एढा होता. अर्थात, आज चांदीच्या दरात ३८३२ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे, गेल्या १३ दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत होती. ती आज थांबली. १७ ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर १३०८७४ रुपये प्रति १० ग्रॅम एवढा होता, यानंतर या दरात सातत्याने घट होत होती.

काय म्हणतायेत एक्सपर्ट - सोन्याच्या दरांवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात सोन्याच्या दरात तेजी दिसून येऊ शकते. कारण जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून (Central Banks) सोन्याची जोरदार खरेदी केली जात आहे.

लग्नाचा हंगाम - भारतात लवकरच लग्नाचा मोठा हंगाम सुरू होत आहे. यामुळे फिजिकल सोन्याची मागणी वाढेल आणि त्याचा थेट परिणाम किमतींवरही दिसून येईल.