शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

१ एप्रिलपासून PAN Card बाबतचे ८ नियम बदलणार! घर-कार खरेदी, हॉटेल बिल सर्वांवर होणार परिणाम; जाणून घेणं आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 10:48 IST

1 / 10
Pan Card Rules: १ एप्रिल २०२६ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांमध्ये मोठे बदल होणार आहेत. आयकर नियम २०२६ (Income Tax Rules 2026) अंतर्गत सरकार पॅन कार्डशी संबंधित असे बदल लागू करणार आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खरेदी, गुंतवणूक आणि खर्चाच्या पद्धतीवर होईल. या बदलांमधील सकारात्मक बाब म्हणजे लहान व्यवहारांमध्ये दिलासा मिळणार आहे, मात्र मोठ्या खर्चावरील देखरेख अधिक कडक केली जाणार आहे.
2 / 10
या बदलांमागे सरकारचा उद्देश अत्यंत स्पष्ट आहे. उच्च मूल्याच्या व्यवहारांवर लक्ष ठेवणं, कर प्रणालीला डेटा-ड्रिवन बनवणे आणि सामान्य वापरकर्त्यांसाठी नियम सोपे करणं हा यामागचा मुख्य हेतू आहे. थोडक्यात सांगायचं तर, कमी कटकट आणि जास्त ट्रॅकिंग असं या नवीन प्रणालीचं स्वरूप असेल.
3 / 10
या नवीन नियमांमुळे रोख व्यवहारांची मर्यादा, कार किंवा बाईक खरेदीचे नियम, हॉटेल आणि इव्हेंट पेमेंटची सीमा, प्रॉपर्टी डीलमधील पॅनची मर्यादा आणि विम्यातील अनिवार्यतेमध्ये बदल होणार आहेत.
4 / 10
नवीन नियमानुसार, जर पूर्ण आर्थिक वर्षात १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली किंवा काढली गेली, तर पॅन कार्ड अनिवार्य असेल. यापूर्वी ५०,००० रुपयांच्या दैनंदिन व्यवहारावर पॅन कार्ड आवश्यक होते. या बदलामुळे आता रोज पॅन कार्ड देण्याची गरज संपणार असून वर्षाचा एकूण व्यवहार महत्त्वाचा ठरेल.
5 / 10
आता ५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची वाहन खरेदी करताना पॅन कार्ड अनिवार्य असेल. याआधी प्रत्येक गाड्यांच्या खरेदीवर पॅन कार्ड देणं आवश्यक होतं. या बदलामुळे लहान वाहन खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
6 / 10
हॉटेल, रेस्टॉरंट किंवा इव्हेंटच्या बिलासाठी आता १ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्यास पॅन कार्ड द्यावं लागेल. पूर्वी ही मर्यादा ५०,००० रुपये इतकी होती.
7 / 10
मालमत्ता व्यवहाराच्या बाबतीत पॅन कार्डची मर्यादा १० लाख रुपयांवरून वाढवून आता २० लाख रुपये करण्यात आली आहे. २० लाख रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या व्यवहारांसाठी पॅन अनिवार्य असेल. यामुळे रिअल इस्टेट व्यवहारांचे ट्रॅकिंग वाढेल आणि करचोरीला लगाम बसेल.
8 / 10
विमा क्षेत्रासाठी आता नवीन नियम लागू होणार असून, विमा सुरू करताच पॅन कार्ड अनिवार्य असेल. यापूर्वी ५०,००० रुपये प्रीमियमवर पॅन कार्ड लागत होतं, मात्र आता प्रत्येक पॉलिसी ट्रॅक केली जाईल.
9 / 10
आता पॅन कार्ड केवळ एक कागदपत्र नसून तुमची आर्थिक ओळख बनली आहे. लहान खर्चात दिलासा मिळाला असला तरी मोठ्या व्यवहारांचे पूर्णपणे ट्रॅकिंग केलं जाईल. यामुळे तुम्हाला रोख रकमेचा वापर मर्यादित करावा लागेल.
10 / 10
या बदलांच्या पार्श्वभूमीवर तुमचे पॅन-आधार लिंक असल्याचे तपासा आणि पॅन कार्ड सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. कोणताही मोठा खर्च करण्यापूर्वी नवीन मर्यादा नीट समजून घ्या आणि शक्यतो रोख रकमेऐवजी डिजिटल पेमेंटचा अवलंब करा.
टॅग्स :Pan Cardपॅन कार्डGovernmentसरकारMONEYपैसा